Tuesday, August 5, 2025
Home टेलिव्हिजन उर्फी जावेदने ‘या’ मोठ्या कारणासाठी दिला रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी शोला नकार

उर्फी जावेदने ‘या’ मोठ्या कारणासाठी दिला रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी शोला नकार

उर्फी जावेद नेहमीच तिच्या नवनवीन लुक्सने आणि कपड्याने सोशल मीडियावर आग लावत असते. तिला असेच नाही सोशल मीडिया सेन्सेशन म्हणत. लाइमलाईट्मधे कसे राहायचे, मीडियाचे आणि लोकांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे तिला बरोबर माहित आहे. तिला तिच्या विचित्र कपड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. मात्र ती त्याकडे कधी लक्ष देत नाही. मात्र मधल्या काही काळापासून उर्फी लवकरच सुरु होणाऱ्या रोहित शेट्टीच्या ‘खतरो के खिलाडी’ सिझन १३ मध्ये दिसणार असल्याच्या बातम्यांना ऊत आला होता. निर्मात्यांनी तिला याबाबत विचारणा केल्याची देखील बातमी होती. मात्र आता तिने या शोला नकार दिला आहे. यामागे देखील मोठे कारण आहे.

उर्फी जावेदसोबत मागील काही दिवसांपासून खतरो के खिलाडीच्या निर्मात्याचे बोलणे चालू होते. एवढेच नाही तर ती हा शो करण्यासाठी खूप उत्साही देखील होती. मात्र आता ती या शोचा भाग नसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून उर्फीची एका मोठ्या प्रोजेक्टसाठी चर्चा चालू होती. जो तिने खतरो के खिलाडीच्या आधीच फायनल केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीने खतरो के खिलाडी या शोला नकार दिल्यामागे सांगितले जात आहे की तिने एका नवीन मोठ्या प्रोजेक्टची ऑफर स्वीकारली आहे. मात्र हे प्रोजेक्ट नक्की काय आहे हे अजून समोर आले नाही. तत्पूर्वी उर्फी जावेद मागे फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या शोसाठी मॉडेल म्हणून दिसली होती. एवढेच नाही तर ती त्यांच्या एका पार्टीमध्ये देखील दिसली होती.

अबू जानी आणि संदीप खोसला यांच्याबद्दल सोशल मीडियावर उर्फीने लिहिले होते की, “अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातल्यामुळे मी खूप खुश आहे. ते जे करतात त्यात ते मास्टर्स आहे. आणि त्यांनी मी जी कोणी आहे त्यासोबत मला स्वीकारत मला जास्त सशक्त वागणूक दिली. कोणताही डिझायनर मला कपडे देत नव्हता, म्हणून मीच माझे कपडे डिझाइन करायला सुरुवात केली. या दीघनि हे बदलवले आहे.” तत्पूर्वी उर्फी लवकरच सगळ्यांसोबत या नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती शेअर करेल अशी शक्यता आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सतीश कौशिक यांच्यावर संपूर्ण सीने इन्डस्ट्रीजचे कलाकार करायचे प्रेम, सोशलवर आलाय श्रद्धांजलीचा पूर्, अनेकांना अश्रू अनावर
‘विवाह’ फेम पूनम म्हणजेच अभिनेत्री अमृता राव एका जाहिरातीसाठी घेते एवढे पैसे; करोडो संपत्तीची आहे मालकीण 

हे देखील वाचा