Saturday, June 29, 2024

सेलिब्रिटींची लगीन घाई! पुनीत पाठक सुद्धा लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

मंडळी सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. इतर वेळेस ठीक आहे परंतु कोरोना काळात लग्न होतील की नाही ही शंका होती. परंतु सामान्य परिस्थितीच्या तुलनेत महामारीच्या काळातच जास्त लग्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामान्य लोकं सोडा हो परंतु सेलिब्रिटीदेखील यातून सुटले नाहीत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सना खान, आदित्य नारायण, नेहा कक्कर यांच्या लग्नांबद्दल आपण वाचलं असेलच. आता या यादीत आणखी एक नावाची भर पडली आहे आणी ते नाव म्हणजे डान्सर, अभिनेता पुनीत पाठक!

ऑगस्टमध्ये झाला होता साखरपुडा
पुनीत ने त्याची प्रेयसी निधी सोबत लग्न करणार असल्याचं सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना सांगितलंच होतं. ऑगस्टमध्ये या दोघांनी घरच्यांच्या आणि काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत साखरपुडा केला होता. ज्याचे फोटो देखील या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकले होते.

इन्स्टाग्रामवर जाहीर केली लग्नाची तारीख
डान्सर, अभिनेता पुनीत पाठक आणि निधी सिंह यांच्या साखरपुड्यानंतर चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली होती. हे दोघे केव्हा लग्न बंधनात अडकणार याबद्दल सतत प्रश्न विचारले जात होते. यावर पुनीत ने त्याच्या इन्स्टाग्राम वर ११/१२/२०२० या तारखेचा एक फोटो अपलोड केला आहे आणि ‘आयुष्याच्या नव्या अध्यायाची सुरुवात!’ असं कॅपशनदेखील दिलं आहे. तर त्याची प्रेयसी तसच होणारी पत्नी निधी हिने देखील दोघांचा एक सुंदर फोटो टाकून सोबत वरील तारखेचा उल्लेख करून सात जन्माची ही पहिली तारीख आहे या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना लग्नाच्या तारखेची हिंट दिली आहे.

 

बॉलिवूड मधली यशस्वी कारकीर्द
पुनित पाठक हा डान्स रिऍलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’ च्या दुसऱ्या सिझनचा फायनलिस्ट ठरला होता. याशिवाय त्याने प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा यांच्या ‘एबीसीडी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने एबीसीडी २, स्ट्रीट डान्सर या सिनेमांमधून काम केलं आहे. विशेष करून एबीसीडी या सिनेमातली त्याची चंदू ही भूमिका खूप गाजली होती. इतकंच नाही तर खतरो के खिलाडी च्या नवव्या पर्वाचा पुनीत हा विजेता देखील ठरला होता. याशिवाय प्रसिद्ध डान्स रिऍलिटी शो डान्स प्लस या शोमध्ये नृत्य दिगदर्शक मास्टर रेमो सोबत सहपरिक्षक राहिला आहे.

हे देखील वाचा