Tuesday, July 9, 2024

याला काय अर्थय! मुलींना बिकिनीत पाहताच रस्सीखेच खेळायचं सोडून जमिनीवर कोसळली मुलं, व्हिडिओ व्हायरल

टीव्हीवरील ‘खतरों के खिलाडी‘ या प्रसिद्ध रियॅलिटी शोला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळते. त्यामुळेच हा शो आज त्याच्या १२व्या सिझनमध्ये पोहोचला आहे. या शोमध्ये येणारे स्पर्धक दिलेले आव्हान पूर्ण करत आपला निर्भीडपणा सिद्ध करतात. अशात २ जुलै रोजी रात्री ९ वाजता टेलिकास्ट झालेल्या या शोमध्ये सर्व स्पर्धकांनी आपापला दम दाखवला. सर्वांनी स्टंट जोर लावून करण्याचा आणि स्वत:च्या भीतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही स्पर्धकांना आपल्या चुकीचं फळही मिळालं. यामध्ये अनेरी वजानी, चेतना पांडे, श्रृती झा, तुषार कालिया, जन्नत झुबेर, मोहित मलिक आणि एरिका पॅकर्ड सामील आहेत. आता हे सर्वजण ३ जुलैला पुन्हा स्टंट करतील.

असेही वृत्त आहे की, यापैकी एक खेळाडू स्पर्धेतून बाहेरही होऊ शकतो. मात्र, होस्ट रोहित शेट्टी (Rohit Shetty) याची कृपा राहिली, तर त्या स्पर्धकाला संधी मिळून तो दुसऱ्या आठवड्यातही पाठवू शकतो. मात्र, या सर्व चिंतांपासून दूर आता सर्वजण बीचवर मजा-मस्ती करत आहेत. ते सर्वजण रस्सीखेच खेळ खेळत आहेत.

रोहित शेट्टी याच्या ‘खतरों के खिलाडी १२’ (Khatron Ke Khiladi) शोमध्ये मुली त्यांच्या अदांनी सर्वांना घायाळ करत आहेत, तर दुसरीकडे मुले आपली बॉडी आणि सिक्स पॅक ऍब्स फ्लॉन्ट करण्यातही मागे नाहीयेत. चॅनेलकडून शेअर करण्यात आलेल्या या शोच्या प्रोमो व्हिडिओत सर्व महिला स्पर्धक बिकिनीमध्ये दिसत आहेत, तर मुलेही धिप्पाड शरीरयष्टीचे प्रदर्शन करत आहेत. त्यांचे वेगवेगळे संघही आहेत. ते टग ऑफ वॉर गेम खेळताना दिसत आहेत.

राजीव अदातिया याने मुलींना दिली मात
सुरुवातीला जिथे मुलं जिंकणार असतात, तिथे संघाचे नेतृत्व करणाऱ्या रुबीना दिलैक (Rubina Dilaik) आपले डोकं चालवते. ती तिच्या मागे उभ्या असलेल्या सर्व मुलींना सांगते की, संघातील मुलांचे लक्ष विचलित करा. मग काय, कुणी फ्लाइंग किस दिते, तर कुणी श्रग काढून बिकिनीमध्ये आपला जलवा दाखवतात. तसेच, त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. त्या सगळ्यांना अशा अवतारात बघून सर्व पुरुष स्पर्धक तिथेच पडतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

मात्र, राजीव अदातिया (Rajiv Adatiya) धैर्याने समोरच्या संघाला सामोरे जातो. तो त्याच्या संपूर्ण शरीराभोवती संपूर्ण दोरी गुंडाळतो. हे पाहून मुली आश्चर्यचकित होतात. दोन्ही बाजूंनी जोर लावला जातो, पण ते अशाप्रकारे खेचतात की सर्व मुली मेटाकुटीस येतात आणि रुबीनाचा संघ पराभूत होतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

या शोला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. आता कोणते कलाकार या शोमध्ये तग धरू शकतात, आणि कोणाला बाहेर जावे लागू शकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

‘या’ दिग्दर्शकापुढे धर्मेंद्र आणि अमिताभ यांचीही बोलती व्हायची बंद, वाचा गाजलेला किस्सा

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा