Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

KKK 12 | ‘खतरों के खिलाडी’ला मिळाले पाच फायनलिस्ट, यावर्षी कोण जिंकेल ट्रॉफी

‘खतरों के खिलाडी’ या टीव्ही रियॅलिटी शोची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आता या शोचा बारावा सीझन म्हणजेच ‘खतरों के खिलाडी १२’ प्रसारित होत आहे. या शोलाही खूप पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे, या शोला आता टॉप ५ फायनलिस्ट मिळाले आहेत. आता हा शो आणखी रंजक बनणार आहे. या शोचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी (Rohit Shetty) करत आहे.

केपटाऊनमध्ये सुरू आहे शूटिंग
शोचे स्पर्धक अतिशय जोमाने हे धोकादायक स्टंट करत आहेत आणि शो सुरू आहे. अनेक खेळाडू या शोमधून बाहेर पडले असले, तरी जे आहेत त्यांनी मात्र पूर्ण रंगत ठेवली आहे. शोला त्याचे पाच फायनलिस्ट मिळाले आहेत आणि शो आता लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे. रोहित शेट्टीने होस्ट केलेल्या या शोने नेहमीच टीआरपीच्या यादीत स्थान मिळवले आहे आणि पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या शोचे शूटिंग सध्या केपटाऊनमध्ये सुरू आहे. (khatron ke khiladi season 12 top 5 contestants)

टॉप ५ कलाकार
‘खतरों के खिलाडी १२’ च्या फॅन पेजनुसार रुबिना दिलैक (Rubina Dilaik) व्यतिरिक्त तुषार कालिया (Tushar Kalia), मिस्टर फैजू (Mr Faizu), जन्नत झुबेर (Jannat Zubair) आणि मोहित मलिक (Mohit Mallik) हे टॉप ५ स्पर्धकांच्या यादीत आहेत. अशा प्रकारे, यापैकी एक स्पर्धक ‘खतरों के खिलाडी १२’ची ट्रॉफी जिंकेल. ‘खतरों के खिलाडी १२’चे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये सुरू आहे.

हे देखील वाचा