भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव आहे तब्बल ‘इतक्या’ कोटीच्या संपत्तीचा मालक, आकडा ऐकाल तर व्हाल स्तब्ध


भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव ( khesari Lal Yadav) यांची इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख आहे. खेसारी लाल यादव चित्रपट आणि म्युझिक व्हिडीओ यांच्या माध्यमातून त्याने प्रेक्षकांचे भरभरून प्रेम आणि लोकप्रियता मिळवली. या अभिनेत्याने मिळवलेले हे सर्व यश मेहनतीने आणि स्वतःच्या बळावर मिळवले आहे. खेसारी लाल यादव हा भोजपुरी मध्येच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पण प्रसिद्ध आहे. खेसारी लाल यादव हे लिट्टी चोखा विकायचे परंतु आता ते करोडोच्या संपत्तीचे मालक आहे.

प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट अभिनेता आणि गायक खेसारी लाल यादव यांचे खरे नाव शत्रुघ्न यादव आहे. त्याचा सामान्य व्यक्तीपासून ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास अतिशय कठीण आणि चढ-उतारांनी भरलेला होता. खेसरी लालचा जन्म ३ जुलै १९८३ रोजी रसूलपुर चट्टी, छपरा, बिहार येथे झाला, २०११ मध्ये ‘साजन चले ससुराल’ या चित्रपट द्वारे पदार्पण करणारा अभिनेता आज भोजपुरी चित्रपट मध्ये सुपरस्टार गायक आणि अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

खेसारी लाल यादव इतके मानधन घेतो
खेसारी लाल यादव यांची शाही जीवनशैली सर्वांनाच वेड लावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार २०२१ मध्ये खेसारी लाल यादव याची नेटवर्थ २ ते ३ मिलियन डॉलर आहे. खेसारी लाल यादवकडे १२ ते १५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भोजपुरी चित्रपटाचा स्टार खेसारी लाल यादव ५० ते ६० लाख रुपये मानधन घेतो. एवढेच नाही तर खेसारी जाहिरातींसाठीही मोठी रक्कम घेतो. खेसारी लाल यादवच्या चित्रपटांवर प्रेक्षक खूप प्रेम करतात. त्याचा चाहतावर्ग देखील जास्त आहे

खेसारी लाल यादवला महागड्या गाड्या खूप आवडतात
खेसारी लाल यादव करोडो संपत्तीचा मालक असून त्याची जीवनशैली आणि राहणीमान प्रेक्षकांना खूप आवडते. खेसारी लाल यादवचे पटना येथे एक आलिशान घर आहे. मुंबईमध्ये देखील त्याचे घर असून त्याची किंमत लाखों मध्ये आहे. खेसारी लाल यादवला महागड्या गाड्या देखील खूप आवडतात. खेसारी लाल यादवकडे टोयोटा फॉर्च्युनरव्यतिरिक्त बीएमडब्ल्यू, लँड रोव्हर आणि फॉर्च्युनर सारख्या अनेक लक्झरी कार आहेत. हे सर्व त्याने स्वतःच्या बळावर कमवले आहे. खेसारी लाल यादवने बिग बॉस सीजन १३ मध्ये सहभाग घेतला होता. भोजपुरी मध्ये नाही तर तो बॉलीवूडमध्ये देखील लोकप्रिय आहे.

हेही वाचा-

पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग

एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख

समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर


Latest Post

error: Content is protected !!