Friday, July 5, 2024

नवं गाणं, नवा धमाका! खेसारी लाल यादवच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या गाण्यावर पडतोय हिट्सचा पाऊस

भोजपुरी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादव या दिवसात खूपच धमाल करताना दिसत आहे. एका नंतर एक अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन ते भोजपुरी संगीत क्षेत्राला एका वेगळ्याच उंचीवर पोहचवत आहे. एकीकडे खेसारी लाल यांचे सोशल मीडिया वरील फॅन फॉलोविंग तर दुसरीकडे त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता यामुळे सध्या त्यांचे नावं प्रत्येकाच्या ओठावर आहे. काही दिवसांपूर्वी खेसारी लाल यांचे एक प्रदर्शित झाले‌ होते.त्यांचे बंगलिनीया हे भोजपुरी गाणे यूट्यूबवर प्रदर्शित झाले होते. या गाण्याने सगळीकडे खूप धुमाकूळ घातला होता.या गाण्यात त्यांच्या सोबत पाखी हेगडे ही अभिनेत्री दिसली होती.

नुकतेच खेसारी लाल यांचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ‘बंगलिनीया देवेले हजार गारी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. भोजपुरी संगीत प्रेमींकडून या गाण्याला खूप हिट्स मिळताना दिसत आहे. त्यांचे हे गाणे १७ एप्रिलला जेडीआर भोजपुरी यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केले आहे. केवळ ४ दिवसातच भोजपुरी प्रेक्षकांनी या गाण्याला एवढा प्रचंड प्रतिसाद दिला आहे की, या गाण्याला ७ लाखा पेक्षाही जास्त वेळा बघितले गेले आहे आणि अगदी मिनिटागनिक हा आकडा वाढत आहे. या व्हिडिओला मिळणारे प्रेम बघून असे वाटत आहे की, हे गाणे लवकरच मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार करणार आहे.

या गाण्यात तुम्ही बघू शकता की, अभिनेत्री शेतात काम करताना दिसत आहे. तसेच ती जोरदार डान्स करताना देखील दिसत आहे. हा वेगळाच अंदाज पाहून हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खेसारी लाल यांचे हे नवीन गाणे भोजपुरी दर्शकांना खूपच आवडत आहे. त्याचे चाहते या व्हिडिओला कमेंट करून त्याच्या या गाण्याचे कौतुक करत आहेत.

हे देखील वाचा