Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड शिवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचे नवे गाणे; पोस्टर झाले प्रदर्शित…

शिवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचे नवे गाणे; पोस्टर झाले प्रदर्शित…

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार लवकरच महाकालच्या भक्तीत मग्न होताना दिसणार आहे. ‘महाकाल चलो’ हे त्याचे गाणे महाशिवरात्रीपूर्वी प्रदर्शित होणार आहे. ही माहिती स्वतः अभिनेत्याने दिली. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर गाण्याचे पोस्टर शेअर करून याची घोषणा केली आहे.

अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये तो शिवभक्ताच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टरमध्ये अक्षय शिवलिंग धरलेला दिसतोय आणि महादेवाच्या भक्तीत मग्न आहे. अक्षयने त्याच्या पोस्टला कॅप्शन दिले, “ओम नमः शिवाय! उद्या महाकालाची शक्ती आणि भक्ती अनुभवा…, महाकाल चलो उद्या प्रदर्शित होत आहे.”

महाकालला समर्पित हे गाणे अक्षय कुमार, पलाश सेन आणि विक्रम माँट्रोज यांनी गायले आहे. संगीत विक्रम माँट्रोज यांनी दिले आहे आणि बोल शेखर अस्तित्त्वा यांनी लिहिले आहेत. हे गाणे गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केले आहे. अक्षय कुमारचे हे गाणे शिवरात्रीच्या निमित्ताने रिलीज होत आहे आणि त्याचे चाहते त्याबद्दल खूप उत्सुक आहेत. महाकालला समर्पित अभिनेत्याचे हे गाणे १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

हृतिक-ऐश्वर्याच्या या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण; आता ऑस्करने केली एक मोठी घोषणा

हे देखील वाचा