Tuesday, July 9, 2024

‘आम्हा तिघांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा’, म्हणत खुशबू अन् संग्रामने केला खास फोटो शेअर

सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाला आहे. अनेक कलाकारांनी त्यांचे बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील एका सेलिब्रेटी कपलसाठी हा गणेशोत्सव खूप खास आहे. ते जोडपे म्हणजे अभिनेता संग्राम साळवी आणि अभिनेत्री खुशबू तावडे होय. नुकतेच काही दिवसांपूर्वी खुशबू आणि संग्रामने ते आई-बाबा होणार आहेत, ही गोड बातमी आपल्याला दिली होती. अशातच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना खास अंदाजात गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खुशबूने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत तिचा पती संग्राम साळवी देखील दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, खुशबूने हिरव्या रंगाची साडी नेसलेली आहे. हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, केसात गजरा असा सगळा साजशृंगार केला आहे. फोटोमध्ये तिचे बेबी बंप दिसत आहे. तसेच संग्राम पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. ते दोघेही हा फोटोमध्ये फार सुंदर दिसत आहेत. (khushboo tawade and sangram salavi share a special photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आम्हा तिघांकडून तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.”

तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. तसेच अनेक कलाकार देखील या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अभिनेत्री मयुरी देशमुख हिने “गोंडस,” अशी कमेंट केली आहे. तसेच रीना अग्रवाल हिने हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

त्याचबरोबर संग्रामनेही हीच पोस्ट त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे.

संग्राम आणि खुशबू हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. संग्रामने ‘पन्हाळा’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘मितवा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने ‘सरस्वती’ आणि ‘देवयानी’ या मालिकेत काम केले आहे. त्याची ‘देवयानी’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेत त्याच्यासोबत शिवानी सुर्वे ही मुख्य भूमिकेत होती. तसेच खुशबूने ‘एक मोहर अबोल’, ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’, ‘प्यार की एक कहाणी’, ‘तेरे लिये’, ‘तारक मेहता का उलटा चष्मा’, ‘देवयानी’ या मालिकेत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझ्या सर्वस्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, म्हणत सिद्धार्थने पत्नी मितालीला केले विश

-आहा…किती ते देखणं रूप! प्रार्थना बेहेरेचे सुंदर फोटो पाहून चाहत्यांच्या बत्त्या गुल

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

हे देखील वाचा