Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

खुशी कपूर झाली घराबाहेर स्पॉट अन् सगळीकडे होऊ लागली तिच्या वॉलपेपरची चर्चा, पाहून तुम्हीही व्हाल भावुक

बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने अद्याप बॉलिवूडमध्ये प्रवेश केलेला नाही, तरीही तिची फॅन फॉलोविंग एखाद्या कलाकारापेक्षा कमी नाही.  खुशीच्या नावाचे सोशल मीडियावर बरेच फॅन पेज आहेत. मंगळवारी (१९ मे) खुशी तिच्या घराबाहेर स्पॉट झाली होती. फोटोमध्ये खुशीच्या मोबाईलमधल्या लॉक स्क्रीनने सर्वांची मने जिंकली आहेत.

फोटोमध्ये खुशी कपूर ब्लॅक कलरच्या आउटफिटमध्ये दिसली होती. त्यासोबतच तिने गुलाबी रंगाचा मास्क लावला होता. खुशीने पॅपराजींचीही विचारपूस केली. यावेळी, तिच्या मोबाईलचे वॉलपेपर फोटोत कैद झाले, जे आता व्हायरल झाले आहे.

खुशीच्या मोबाईल वॉलपेपरवर तिची आई श्रीदेवी, यांच्यासोबत खुशीचा बालपणीचा फोटो आहे. हे गोंडस फोटो पाहून चाहते भावूक झाले आहेत. खुशीने यापूर्वीच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोमध्ये छोटी खुशी, आई श्रीदेवीच्या खांद्यावर बसली आहे. एका युजरने कमेंट केली, ‘आई ही आई आहे. तीसुध्दा तुझी आठवण काढत असणार.’

मातृदिनानिमित्त खुशीने आपल्या आईची आठवण करून देत तिच्याबरोबर बालपणीचे फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तिची मोठी बहीण जाह्नवीसुद्धा दिसली आहे. हे फोटो शेअर करताना खुशीने लिहिले, ‘मातृदिनाच्या शुभेच्छा!’ खुशीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

खुशी कपूरच्या बॉलिवूड एंट्रीची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. काही काळापूर्वी खुशीचे वडील बोनी कपूर तिच्या बॉलिवूडमधील प्रवेशाबद्दल उघडपणे बोलले होते. बोनी कपूर म्हणाले होते की, ‘मी खुशीला लाँच करणार नाही. माझ्याकडे एक संसाधन आहे, परंतु दुसरे कोणीतरी लाँच करावे अशी माझी इच्छा आहे. कारण मी त्यांचा पिता आहे, आणि मी तिच्या चुकांकडे लक्ष देणार नाही. तसेच एक चित्रपट निर्माता म्हणून आपण हे करू शकत नाही. तसंच कलाकारांसाठीही ते चांगलं नाही. मला आनंद हवा आहे.’

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो

-अगं बाबोव! आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गाण्यात उर्वशीने घातला होता ‘इतक्या’ कोटींचा ड्रेस; किंमत वाचून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-चक्रीवादळामुळे अभिनेत्री दीपिका सिंगच्या घरापुढे पडले झाड, मग काय अभिनेत्रीने झाडासमोरच लावले जोरदार ठुमके; एकदा पाहाच

हे देखील वाचा