काल हिंदी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री असणाऱ्या कियारा आडवाणीचा वाढदिवस होता. ती आज तिचा २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. कियाराने एका फ्लॉप सिनेमापासून तिच्या करिअरला सुरुवात केली, मात्र तिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आणि चिकाटीने पुन्हा दुसरी संधी मिळवली. कियाराने तिचा वाढदिवस कसा साजरा केला, याचा एक छोटा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल झाला आहे.
कबीर सिंग सिनेमातून कियाराने अमाप लोकप्रियता मिळवली. कियाराने आज तिच्या जवळच्या मित्रांसोबत तिचा वाढदिवस साजरा केला. या पार्टीचा व्हिडिओ कियाराने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कियाराने पिवळा टॉप आणि पांढरी पॅन्ट घातली असून तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन चालू आहे. या व्हिडिओमध्ये एक केक दिसत असून, तो खूपच खास आहे. या केकमधून काही फोटोज बाहेर काढताना कियारा दिसत आहे. केकसोबतच बलूनचा बँच दिसत आहे. हा केक पाहून कियारा खूप खुश झाली आहे.
हा व्हिडिओ आणि फोटो शेअर करताना कियाराने सांगितले कि, यावर्षीचा वाढदिवस तिने कोणत्या खास लोकांसोबत साजरा केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “#AboutLastNight #raataanlambiyan माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सर्वात जुन्या गोल्डन क्रूसोबत मला खूप प्रेम जाणवत आहे.” कियाराने तिचा हा वाढदिवस तिच्या जुन्या मित्रमैत्रिणींसोबत साजरा केला. विशेष म्हणजे, यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा देखील याठिकाणी उपस्थित होता.
कियाराच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘शेरशाह’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. नुकतेच यातील पहिले गाणे ‘राता लंबिया’ देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याशिवाय ती वरुणसोबत ‘जुग जुग जियो’ सिनेमात दिसणार असून, कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया २’ मध्ये देखील दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अवघड आहे! ‘ते’ गाणं श्रेया घोषालला पडतंय बरंच महागात, लाखो चाहते करताय ट्रोल
-आर्थिक संकटातून जात आहे ‘बालिका वधू’चे कुटूंब; अभिनेत्रीच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख