सिनेजगतातील अभिनेत्रींच्या फॅशनची सोशल मीडियावर नेहमी चर्चा पाहायला मिळते. कधी त्यांच्या महागड्या ड्रेसची तर कधी भन्नाट फॅशनची माध्यमांमध्ये चर्चा होताना दिसत असते. परंतु अशा अतरंगी फॅशनमुळे बॉलिवूडमधील अभिनेत्रींना ट्रोलिंगचाही मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो.असाच प्रकार अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत घडला असून तिच्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी कियाराला जोरदार ट्रोल केले आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
कियारा अडवाणी (Kiara Advani) ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या अभिनयाइतकीच कियारा सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंची आणि लूकची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. कियाराचा अलिकडेच प्रदर्शित झालेला जुग जुग जियो चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात कियाराने साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र जोरदार कौतुक करण्यात आले होते. चित्रपटाच्या जोरदार यशानंतर निर्माता करण जोहरने पार्टीचे आयोजन केले होते.
View this post on Instagram
या पार्टीला चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्री कियारा अडवाणीला तिच्या ड्रेसमुळे नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागले. कियारा या पार्टीत खूपच सुंदर दिसत होती. परंतु तिचा ड्रेसकाही नेटकऱ्यांना आवडला नाही. यावेळी पार्टीत कियाराने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला होता. त्याचबरोबर त्यावर तिने ब्लेजरही घातले होते. हलकासा मेकअप केला होता. या लूकमध्ये कियारा खूपच सुंदर दिसत होती. कियाराच्या या लूकवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी ही कसली फॅशन आहे म्हणत तिच्यावर निशाणा साधला आहे. तर काही जणांनी पॅंन्ट घालायची विसरली वाटत, असे म्हणत कियाराची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान अभिनेत्री कियारा अडवाणीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, जुग जुग जियो चित्रपटाच्या आधी तिचा भुलभूलैय्या चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.
हेही वाचा –
‘अशी’ झाली ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाची शूटिंग, आलिया भट्टने केला बीटीएस व्हिडिओ शेअर
‘या’ चित्रपटाच्या यशाने अर्जुन कपूरला बसला होता धक्का; म्हणाला, ‘आयुष्यात कधी…’