Friday, August 8, 2025
Home बॉलीवूड कियारा अडवाणीच्या प्रेमापोटी वेड्या चाहत्याने केलं ‘हे’ कृत्य, हैराण झाली अभिनेत्री

कियारा अडवाणीच्या प्रेमापोटी वेड्या चाहत्याने केलं ‘हे’ कृत्य, हैराण झाली अभिनेत्री

कियारा अडवाणी (Kiara Advani) ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकतीच ती ‘जुग जुग जिओ’मध्ये दिसली आहे. या चित्रपटाला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, पण कियाराने मात्र प्रत्येक वेळी प्रमाणेच चाहत्यांची मने जिंकली. कियाराने तिच्या करिअरची सुरुवात ‘फगली’ या चित्रपटातून केली होती. तिची फॅन फॉलोविंगही जबरदस्त आहे. दरम्यान अशातच आता कियारा अडवाणीने तिच्या एका वेड्या चाहत्याशी संबंधित एक धक्कादायक किस्सा सांगितला आहे.

कियाराच्या वेडेपणात चाहत्याने केलं ‘हे’ कृत्य
कियारा अडवाणीने एका मुलाखतीत सांगितले की, तिच्या एका चाहत्याने तिला घाबरवले होते. कियारा मुंबईतील प्रसिद्ध महालक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या खूप वरच्या मजल्यावर राहते. अशा परिस्थितीत तिच्या चाहत्याने लिफ्टमधून येण्याऐवजी जिन्यांवरून येण्याचा निर्णय घेतला, कारण की कियाराला तो किती मोठा फॅन आहे हे कळावे. (kiara advani fan surprised climbed 51st floor of her house)

कियारा तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर कियारा सिद्धार्थ मल्होत्राला (Sidharth Malhotra) डेट करत आहे. दोघांनीही मीडियासमोर हे नातं अद्याप स्वीकारलं नसलं, तरी दोघेही अनेकदा लंच डेटवर एकत्र दिसले आहेत.

‘जुग जुग जिओ’मध्ये कियाराचा अप्रतिम अभिनय
कियारा अडवाणीचा ‘जुग जुग जिओ’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा चित्रपट २४ जून रोजी प्रदर्शित झाला. रिलीजच्या पाचव्या दिवशी हा फॅमिली ड्रामा चित्रपट ५० कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा