Monday, July 1, 2024

कराऱ्या नजरेने घायाळ करणाऱ्या कियाराचा ‘हा’ फोटो पाहिला का? कलरफुल आऊटफिट गजब दिसतेय अदाकारा

बॉलिवूडची क्युट, बबली गर्ल म्हणून कियारा आडवाणी ओळखली जाते. ‘फगली’ या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या कियाराने जरी पहिल्याच सिनेमात अपयश पाहिले असले, तरी दुसऱ्या ‘धोनी’ सिनेमाने तिला मोठे यश दाखवले. कियाराने मोठ्या मेहनतीने आभाळाएवढे यश संपादन केले आहे. ‘कबीर सिंग, ‘गुड न्यूज़’, ‘इंदू की जवानी’ आदी चित्रपटातून तिने तिची ओळख आणि या इंडस्ट्रीमधील जागा पक्की केली आहे.

कियारा लवकरच ‘शेरशाह’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असणारी कियारा नुकतीच ‘हॅलो मासिक’च्या कव्हरपेजवर झळकली आहे. या कव्हरपेजच्या फोटोमध्ये तिने ऑफ शोल्डरचा कलरफुल ड्रेसे घातला आहे. या फोटोमध्ये कियारा खुर्चीवर बसून पोझ देत आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिचा ड्रेस, तिचे मोकळे केस आणि मादक नजर सर्वांनाच आकर्षित करत आहे. या फोटोमध्ये कियाराने अंगठीशिवाय दुसरी कोणतीच ज्वेलरी घातली नसली, तरी तिला त्याची गरजच वाटत नाहीये.

‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून स्टार झालेल्या कियारासाठी ‘लस्ट स्टोरी’ ही वेबसिरीज टर्निंग पॉईंट ठरली. या सिरीजनंतर कियाराने स्वतःला एक प्रभावी आणि सशक्त अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. कियारा चांगलीच लोकप्रिय आहे. सध्या तिच्याकडे बरेच चित्रपट आहेत.

चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी कियाराचे नाव आलिया आडवाणी असे होते, मात्र या क्षेत्रात येण्यापूर्वी तिने तिचे नाव ‘अंजाना अंजानी’ या चित्रपटातील प्रियांकाच्या भूमिकेवरून स्वतःचे कियारा ठेऊन घेतले. कियाराच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे नाव आजही आलिया असल्याचे आपल्या लक्षात येईल. आगामी काळात कियारा कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया २’ , वरुण धवनसोबत ‘जुग जुग जियो’ आणि विक्की कौशल बरोबर ‘मिस्टर लेले’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ लारा दत्ताचा नाही, तर ‘या’ कलाकारांनी देखील परफेक्ट लूकसाठी घेतला होता प्रोस्थेटिक मेकअपचा आधार

-बालकलाकार म्हणून प्रसिद्धी मिळवणारा आदित्य नारायण मुख्य नायकाच्या भुमिकेत ठरला अपयशी; तर ‘या’ वादांशी जोडलं गेलंय त्याचं नाव

-अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

हे देखील वाचा