Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड कियारा अडवाणींच्या टॉपलेस फोटोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सवर, कियाराच्या एका पेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया

कियारा अडवाणींच्या टॉपलेस फोटोवर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सवर, कियाराच्या एका पेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया

चित्रपटांमध्ये काम करणारे कलाकार त्यांच्या फॅन्ससोबत जोडलेले राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडिया सध्याच्या काळात कलाकरांना आणि फॅन्सला देखील एकमेकांशी जोडून ठेवण्याचे काम करतो. कलाकार सतत त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचे स्टेटस किंवा इतर माहिती, फोटो, व्हिडिओ पोस्ट करतात. या सोशल मीडियामुळे कलाकरांना प्रकाशझोतात देखील राहता येते.

या सोशल मीडियाचे किती फायदे असले तरी म्हणतात ना ‘नाण्याला बाजू दोन’ अगदी तसेच जिथे फायदे आहे तिथे तोटे सुद्धा आहेतच. हा नियम सोशल मीडियालाही देखील लागू आहे. कलाकारांच्या सोशल मीडियावरील माहितीला, पोस्टला फॅन्सकडून, नेटकऱ्यांकडून अतिशय गलिच्छ, खालच्या दर्जेच्या भाषेत कमेंट्स केल्या जातात. कलाकरांना त्यांच्या पोस्टवरून ट्रोल केले जाते. या कमेंट्सचा, ट्रोलिंगचा काही कलाकारांवर परिणाम होतो, तर काही कलाकार यासर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. (kiara advani reaction on her toples photo)

याच ट्रोलिंगवर लोकांच्या विचित्र कमेंट्सवर आधारित अरबाज खानचा एक शो आहे ‘पिंच’. या शोमध्ये अरबाज कलाकरांना त्यांच्या पोस्टवर लोकंच्या येणाऱ्या कमेंट्स सांगतो आणि त्यावर हे कलाकार त्यांचे मतं मांडतात. सध्या या शोचा दुसरा सिझन चालू आहे. नुकतीच या शोमध्ये अभिनेत्री कियारा अडवाणींच्या हजेरी लावली होती. त्यावेळी तिने देखील यासर्व गोष्टींवर तिचे मतं मांडले आणि काही कमेंट्स देखील वाचल्या.

मागच्या वर्षी कियाराने प्रसिद्ध फोटोग्राफर असणाऱ्या डब्बू रत्नानीसाठी एक फोटोशूट केले होते. ज्यात ती टॉपलेस झाली आणि एका झाडाच्या पानामागे उभी दिसली. तिच्या याफोटोवर काही नेटकऱ्यांनी तिचे खूप कौतुक केले, तर काहींनी तिला ट्रोल केले. याच फोटोवर आलेल्या काही कमेंट्सवर कियाराने तिचे मतं व्यक्त केले.

एकाने तिच्या या फोटोवर लिहिले होते की, ‘२०२० मध्ये ही एकच गोष्ट चांगली घडली’ यावर कियारा म्हणाली, ‘ही कमेंट मी माझी स्तुतीच समजते.’ अजून एकाने लिहिले, ‘काश! ते पान बकरी खाऊन गेली असती’ यावर तिने खूपच विचित्र तोंड केले. यासोबत कियारा खूप गर्विष्ठ आहे या लोकांच्या प्रश्नाला तिने उत्तर दिले.

कियारा म्हणाली, “नक्कीच गर्विष्ठ हे चुकीचे विशेषण आहे. कलाकर कोणत्या गोष्टीला, चित्रपटांना नकार दिल्यानंतर त्यांच्याबद्दल हे असे मतं लोकं बनवतात. पण असे काहीच नसते प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारणं असतीलच ना.” सध्या कियारा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेरशहा’ सिनेमामुळे खूपच चर्चेत आहे. या सिनेमाला आणि तिच्या भूमिकेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अपारशक्ती खुराणा लवकरच होणार बाबा, शेअर केला पत्नीच्या डोहाळे जेवणाचा सुंदर व्हिडिओ

-‘तुम्ही मला टक लावून पाहत होता पण…’, म्हणत प्रिया बापटकडून फोटो शेअर

-बोल्ड आणि डॅशिंग! ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेहीचा नवीन लूक आला समोर

 

हे देखील वाचा