Sunday, March 1, 2026
Home बॉलीवूड ब्रेकअपच्या बातम्यांना ब्रेक! कियाराच्या लाईव्ह व्हिडिओवर सिद्धार्थने केली ‘अशी’ कमेंट, सुरू झाली ‘ही’ चर्चा

ब्रेकअपच्या बातम्यांना ब्रेक! कियाराच्या लाईव्ह व्हिडिओवर सिद्धार्थने केली ‘अशी’ कमेंट, सुरू झाली ‘ही’ चर्चा

सिनेसृष्टीतून अनेकदा स्टार्सच्या लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्या ऐकायला मिळतात. या बातम्यांमुळे कधी चाहत्यांना धक्का बसतो, तर कधी आनंद होतो. गेल्या काही दिवसांपासून कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​यांच्या ब्रेकअपच्या बातम्या इंडस्ट्रीत खूप चर्चेत होत्या. आता या दोघांशी संबंधित एक मोठी माहिती समोर येत आहे.

अलीकडेच, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या विभक्त झाल्याच्या बातम्यांनी चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता समोर येणारे अपडेट जाणून घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी कियारा अडवाणीने इंस्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत बऱ्याच दिवसांनी लाईव्ह सेशन केले होते. (kiara advani sidharth malhotra are not seperated latest breakup post puts rumours on end)

अशा परिस्थितीत, चाहते दावा करत आहेत की, कियाराचे हे लेटेस्ट लाईव्ह सेशन तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रा ​​याने पाहिले होते. आणि मग काय! ही गोष्ट सिडच्या चाहत्यांच्या लक्षात आली आणि ते सोशल मीडियावर त्याचा स्क्रीन शॉट शेअर करून दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. इतकेच नाही, तर या व्हिडिओवर हजारो चाहत्यांच्या कमेंट्समध्ये सिद्धार्थ मल्होत्राची कमेंटही पाहायला मिळाली. अभिनेत्याने ‘Come On!’ लिहून कियाराला चियर केले. या पोस्टनंतर चाहत्यांना विश्वास बसला आहे की, हे कपल अजूनही एकत्र आहे.

याआधी दोघेही सलमान खानच्या (Salman Khan) ईद पार्टीला एकत्र आले होते. सिद्धार्थ आणि कियारा पहिल्यांदाच ‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात दोघांची केमिस्ट्री कधी नात्यात बदलली हे कळलेच नाही. यानंतर दोघेही अनेकदा व्हेकेशन, इव्हेंट्सवर एकत्र जाताना दिसले. मात्र, या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही बोललेले नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा