Monday, June 23, 2025
Home साऊथ सिनेमा केजीएफ ३ सिनेमात प्रकाश राज यांच्या भूमिकेसाठी फॅन्सची रिप्लेसची मागणी, ‘या’ कलाकाराच्या नावाची केली शिफारस

केजीएफ ३ सिनेमात प्रकाश राज यांच्या भूमिकेसाठी फॅन्सची रिप्लेसची मागणी, ‘या’ कलाकाराच्या नावाची केली शिफारस

केजीएफ हा सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग आला आणि आता लवकरच या चित्रपटाचाच तिसरा भाग येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या प्रशांत निल यांनी स्वतःचा या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. केजीएफ सिनेमाचा तिसरा भाग येणार हे ऐकूनच सिनेमाच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांच्यामध्ये सिनेमासाठी प्रचंड उत्साह दिसून येत आहे. अजून तर सिनेमा प्री प्रोडक्शनमध्ये आहे तरी सिनेमासंदर्भात विविध बातम्या येत आहेत. या सिनेमाला घेऊन प्रेक्षक निर्मात्यांकडे एक मागणी करत आहे, जी कदाचित पूर्ण देखील केली जाऊ शकते.

प्रेक्षकांनी निर्मात्यांकडे अभिनेते प्रकाश राज यांना रिप्लेस करण्याची मागणी केली आहे. सोबतच प्रमख राजला रिप्लेस करत किच्चा सुदीपला त्याजागी घेण्याची विनंती देखील केली आहे. उपेंद्र राव यांच्या ‘कब्जा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये किच्चा सुदीपचा आवाज आणि अंदाज पाहून फॅन्स अक्षरशः त्याच्या प्रेमात पडले आहेत. त्यांना वाटत आहे की, केजीएफ ३ मध्ये प्रकाश राज यांच्या जागी किच्चा सुदीप पूर्णतः फिट बसेल. किच्चा सुदीप त्याच्या आवाजाने या सिनेमाला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाईल.

Kiccha-Sudeepa
Photo Courtesy Instagramkichchasudeepa

‘कब्जा’ सिनेमाचा ट्रेलर पाहून लोकांनी या सिनेमाची तुलना केजीएफसोबत केली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जबरदस्त ऍक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. यासाठीच लोकांची विनंती आहे की, प्रकाश राजला काढून किच्चा सुदीपला त्यात घ्यावे. केजीएफ ३ सिनेमाची शूटिंग २०२५ पासून सुरु होणार असून यात यश पुन्हा एकदा त्याच्या दमदार अंदाजमध्ये पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा २०२६ मध्ये प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
Womens Day Special: आधुनिक विचाराच्या क्षेत्रात राहूनही ‘या’ अभिनेत्री ठरल्या घरगुती हिंसाचाराच्या बळी  

हाेळीच्या रंगात रंगली श्वेता शिंदे

हे देखील वाचा