Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘किचन कल्लाकार’ घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘हा’ नवीन कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी टेलिव्हिजनवरील अनेक कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. यामधीलच ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमाची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि मांडणी प्रेक्षकांना खूपच भावली असून मालिकेने प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. परंतु आता या कार्यक्रमाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली असून हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ. 

झी मराठीवरील ‘किचन कल्लाकार या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गृहिणींसाठी खास पाककृती दाखवणाऱ्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमात मनोरंजन जगतातीलच नव्हेतर अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावत आपली पाककला सादर केली होती. त्यामुळेच या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढली होती. परंतु आता लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपासून या कार्यक्रमाचे मुळ कलाकार बदललेले दिसून येत आहेत. त्यामध्ये सुरूवातीला या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या नाटकामुळे ही मालिका सोडली होती.  त्याचबरोबर कार्यक्रमात महाराजाच्या भूमिकेत असलेले प्रभांत दामलेही लंडन दौऱ्यावर असल्याने त्यांच्या जागी निर्मिती सावंत दिसत आहेत. त्यामुळेच आता हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल अशा चर्चा सुरू आहेत.

https://www.instagram.com/p/Ce78FDvBl3-/?utm_source=ig_web_copy_link

समोर आलेल्या बातम्यांनुसार, किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या जागी डान्स महाराष्ट्र डान्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील डान्सर थिरकरणार असून कार्यक्रमाचे ऑडिशन्स लवकरच सुरू होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या नवीन कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा