पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ सुखी संसार करुन घटस्फोट घेणारे बॉलीवूड तारे, एकाचा संसार तर २२ वर्षांनी मोडला


किम कार्दशियनने लग्नाच्या सात वर्षांनी घेतला घटस्फोट, मात्र काही बॉलिवूड कलाकारांनी तर लग्नाच्या २०/२२ वर्षांनी देखील घटस्फोट घेतला आहे, पाहूया अशाच काही कलाकारांची नावे

मनोरंजन सृष्टीमध्ये नाती आणि लग्न यांची आयुष्यभराची शाश्वती कोणीच देऊ शकत नाही. ‘चले तो शाम तक नही तो चांद तक’ अशीच काहीशी परिस्थिती आहे, याला काही अपवाद देखील आहे. या क्षेत्रातल्या बेभरवशी जीवनामुळे कधी कोणत्या घटना घडतील कोणालाच माहित नसते. वरवर सर्व नीटनेटक्या वाटणाऱ्या गोष्टी आतून मात्र पोकळ असतात. आता लग्नांचे बघा, लग्नाला १५/२० वर्ष झाल्यावर देखील अनेक कलाकारांनी घटस्फोट घेतले आहेत. लग्न मुलं सर्व आलबेल असतानाही लग्नाच्या अनेक वर्षांनी कलाकारांनी काही वैयक्तिक कारणांमुळे सामंजस्याने घटस्फोट घेतल्याची, अनेक उदाहरण आहेत.

नुकतेच प्रसिद्ध अमेरिकन सेलिब्रिटी किम कार्दशियन हिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. किम आणि पती कान्ये वेस्ट यांच्या नात्यात काहीच सुरळीत नसल्याच्या चर्चा काही महिन्यांपासून होत्या. आता किमने घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत, आपल्या चार मुलांच्या जॉईंट कायदेशीर ताब्याची मागणी केली आहे. २०२० च्या उत्तरार्धात किम आणि कान्ये यांच्यात बिनसल्याचे म्हटले जात आहे.

आज या लेखातून आपण अशाच काही बॉलिवूड कलाकारांची नावे पाहणार आहोत, ज्यांनी लग्नाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेत सर्वानाच धक्का दिला.

फरहान अख्तर- अधूना :
बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर याने २००० साली मॉडेल असणाऱ्या अधुनासोबत लग्न केले. मात्र २०१७ साली लग्नाच्या १७ वर्षांनी त्यांनी वेगळे होत घटस्फोट घेतला. फरहानने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यात भाग मिल्खा भाग, जिंदगी मिलेगी ना दोबारा, दिल ढाकणे दो, शिवाय त्याने अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. फरहान अख्तर आणि मॉडल शिबानी दांडेकर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या अधे मधे येत असतात.

हिमेश रेशमिया- कोमल :
लोकप्रिय संगीतकार आणि गायक असणारा हिमेश रेशमिया याचा देखील घटस्फोट झाला आहे. हिमेशने त्याच्या लग्नाच्या २२ वर्षांनी घटस्फोट घेत दुसरे लग्न केले आहे. १९९४ साली हिमेशने कोमलसोबत लग्न केले, मात्र २०१६ साली त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि २०१७ मध्ये त्यांना घटस्फोट मिळाला. त्यानंतर हिमेशने सोनिया कपूरसोबत दुसरे लग्न केले. सध्या हिमेश इंडियन आयडॉल या लोकप्रिय सिंगिंग रियालिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे.

मलाइका अरोड़ा- अरबाज खान :
मलाइका अरोड़ा आणि अरबाज खान यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून बघितले जायचे. १२ डिसेंबर १९९८ ला त्यांनी लग्न केले. या दोघांनी मिळून त्यांचे एक प्रोडक्शन हाऊस देखील चालू केले होते. मात्र या दोघांनी अचानक २०१७ साली ते घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. १९ वर्षांचा संसार त्यांनी २०१७मध्ये संपुष्टात आणला. या दोघांना एक मुलगा असून तो मलाइकाजवळ असतो. सध्या मलाइका आणि अर्जुन कपूर नात्यात असून, अरबाज खान देखील परदेशी मॉडेलला डेट करत आहे.

ऋतिक रोशन- सुजान खान :
या दोघांचा घटस्फोट हा तर सर्वांसाठी खूपच मोठा धक्का होता. सर्वात उत्तम जोडी म्हणून या दोघांकडे पहिले जायचे. या दोघांनी २००० साली लग्न केले होते, त्यानंतर २०१४ साली सामंजस्याने त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोट घेत असताना ऋतिकने सर्वात मोठी रक्कम सुजानला दिले असल्याचे म्हटले जाते. सुजान आणि अर्जुन रामपाल यांच्या नात्याच्या अनेक बातम्यांमुळे ऋतिक रोशन आणि सुजान खान वेगळे झाल्याचे सांगितले जाते. मात्र अजूनही हे दोघे त्यांच्या मुलांसाठी अनेकदा सोबत येतात.

आमिर खान- रीना दत्ता :
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने देखील दुसरे लग्न केले आहे. त्याने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केले होते. या दोघांना जुनेद आणि इरा ही दोन मुलं देखील आहे. मात्र २००२ साली या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोन्ही मुलं रीनाकडे राहू लागली. इकडे आमिरने लगान सिनेमाच्या सहायक दिग्दर्शिकेसोबत म्हणजेच किरण रावसोबत दुसरे लग्न केले आहे.

सैफ अली खान- अमृता सिंग
सैफ आणि अमृता सिंगचा घटस्फोट आजही चर्चेचा विषय आहे. या दोघांनी १९९१ साली लग्न केले. त्यावेळी अमृता ही सैफपेक्षा मोठी आणि लोकप्रिय अभिनेत्री होती. या दोघांना सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं झाली. मात्र २००४ साली लग्नाच्या १३ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१२ ला सैफने करीना कपूरसोबत लग्न केले या दोघांना २ मुलं असून अमृता सारा आणि इब्राहीमसोबत राहते.

अर्जुन रामपाल- मेहर जेसिया
बॉलिवूड हँडसम हंक अर्जुन रामपाल याने १९९८ साली फॉर्मर मिस इंडिया आणि सुपरमॉडल मेहर जेसियासोबत लग्न केले. त्यांना दोन मुली देखील आहे. पण लग्नाच्या २० वर्षांनी त्यांनी २०१९मध्ये घटस्फोट घेतला. हा घटस्फोट मिळण्याच्या आधीच अर्जुन कपूरने त्याची गर्लफ्रेंड गैब्रिएला डेमेट्रियाड्स प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये तिने मुलाला जन्म दिला.


Leave A Reply

Your email address will not be published.