Sunday, February 23, 2025
Home हॉलीवूड हत्येच्या आरोपामुळे कार्दशियन कुटूंबीय आलं चर्चेत, कोर्टात चालुये प्रकरण

हत्येच्या आरोपामुळे कार्दशियन कुटूंबीय आलं चर्चेत, कोर्टात चालुये प्रकरण

हॉलिवूड टीव्ही इंडस्ट्री आणि मॉडेलिंग इंडस्ट्रीवर राज्य करणारे कार्दशियन कुटुंब अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विशेषत: किम कार्दशियनची (Kim Kardashian) आई क्रिस जेनर (Kris Jenner) नेहमीच चर्चेत असते. तिच्याबद्दलच्या अनेक बातम्या नेहमीच सोशल मीडियावर झळकत असतात. सध्या क्रिस जेनर तिच्या एका आरोपामुळे चर्चेत आहे. क्रिस जेनरने लॉस एंजेलिस कोर्टात मॉडेल ब्लॅक चायनाच्या विरोधात साक्ष दिली आहे. क्रिसने तिच्या निवेदनात आरोप केला आहे की, ब्लॅक चायनाने तिचा मुलगा रॉब कार्दशियनला मारण्याचा प्रयत्न केला आहे. या बातमीने सध्या सिनेजगतात चांगलीच चर्चा रंगली आहे.

क्रिस जेनर ही कायली जेनर, किम कार्दशियन, क्लोई कार्दशियन, केंडल जेनर आणि रॉब कार्दशियन यांची आई आहे. जिने तिच्या मुलाची एक्स असलेल्या ब्लॅक चायनावर तिच्या मुलाचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे आणि लॉस एंजेलिस कोर्टरूममध्ये साक्ष दिली आहे. क्रिस जेनरच्या सांगण्यानुसार, ब्लॅकने तिचा मुलगा रॉब कार्दशियनवर बंदूक रोखली आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही, तर रॉब दारूच्या नशेत असताना ब्लॅकने त्याच्या डोक्यात धातूच्या रॉडने वार केले. त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली होती. आपल्या मुलासोबत घडलेल्या या घटनेने क्रि  खूप भावूक झालेली पाहायला मिळाली.

याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “सगळं अस्ताव्यस्त पडल होतं. हे खूप भितीदायक होतं.”  क्रिस तिच्या मुली क्लोई, किम आणि कायलीसोबत ब्लॅक चायनाच्या $100 दशलक्ष कायद्याच्या खटल्याविरुद्ध लढत आहेत. हा खटला अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. याआधी किम कार्देशियन तिच्या व्हायरल सेक्सटेपमुळे चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा