Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

घटस्फोट घेतल्यानंतर किम कर्दाशियन त्याच घराच्या बाथरुममध्ये केले फोटोशुट, ज्या घरात…

टीव्ही स्टार किम कर्दाशियन आजकाल तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. किम तिच्या घटस्फोटमुळे देखील खूपच चर्चेत आहे. गायक कांवे वेस्ट सोबत 6 वर्षांपूर्वी तिने लग्न केले होते. पण आता त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. त्यांच्या संपत्तीची देखील वाटणी होणार आहे आहे. अशातच तिचे सोशल मीडियावरील फोटो प्रेक्षकांना हैराण करत आहेत.

किमने तिच्या घराच्या बाथरूममध्ये फोटोशूट केले आहे, जे घर तिला कान्येसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मिळाले होते.  हे घर त्यांनी 2014 मध्ये 20 मिलियन डॉलरला घेतले होते. पण पुढील चार वर्षात त्यांनी रिनोवेशनसाठी तब्बल 40 मिलियन डॉलर खर्च केले. त्यानंतर ते येथे शिफ्ट झाले. या फोटोत किमच्या बॅकग्राउंडला असणाऱ्या बाथरूमचे खूप कौतुक होत आहे. तिच्या या फोटोला सोशल मीडियावर खूपच पसंती मिळत आहे. ती नेहमीच तिचे फोटो शेअर करून प्रेक्षकांना घायाळ करत असते.

किमची बहिण देखील एक फॅशन स्टार आहे. या फोटोमध्ये किमने जी बिकिनी घातली आहे. ती तिच्या बहिणीच्या कंपनी गुड अमेरिकेची आहे. या निमित्ताने तिने तिच्या बहिणीच्या कंपनीला प्रमोट केले आहे.

https://www.instagram.com/p/CLZZyAlAG9x/

किम आणि कन्येकडे 2 बिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. त्याच्या घटस्फोटानंतर त्यांची प्रॉपर्टी अर्धी करून विभागली जाणार आहे. अश्याप्रकारे किमच्या वाट्याला 70 अरब एवढी रक्कम येणार आहे. किम आणि कान्ये या दोघांना 4 मुले आहेत. त्यांची कस्टडी किमने घेतली आहे.

हे देखील वाचा