Wednesday, June 25, 2025
Home हॉलीवूड ‘सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी मी विष्ठाही खाईन..’ लोकप्रिय अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य

‘सुंदर आणि तरुण दिसण्यासाठी मी विष्ठाही खाईन..’ लोकप्रिय अभिनेत्रीचे धक्कादायक वक्तव्य

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री किम कार्दशियन (kim kardashian)  सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपल्या व्हायरल फोटोसोबतच ती विवादास्पद वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत येत असते. किम कार्दशियन सुंदर दिसण्यासाठी खूप मेहनत घेते. लाइम लाईटमध्ये राहणारी मॉडेल-अभिनेत्री किम कार्दशियन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या आउटफिटमुळे किंवा तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत नाही तर तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. 41 वर्षीय अमेरिकन टीव्ही अभिनेत्री किम कार्दशियन आपली तारुण्य टिकवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. याबद्दलचे तिने एक धक्कादायक विधान केले आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

किम कार्दशियन ही लोकप्रिय अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून लोकप्रिय आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहत असते. पण किम कार्दशियन तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर टिकवून ठेवण्यासाठी कितपत जाऊ शकते? असा प्रश्न विचारल्यानंतर किमने एक धक्कादायक विधान केले आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत बोलताना किमने विधान केले आहे. यामध्ये किम कार्दशियन म्हणाली की, जर तुम्ही मला सांगितले की मी तरुण दिसेन आणि यासाठी मला रोज विष्ठा खावी लागेल तरी मी खाईन. किमचे हे वक्तव्य ऐकून लोक हैराण झाले आहेत. तिच्या या चकित करणाऱ्या वक्तव्याची सगळीकडेच चर्चा रंगली आहे.

अलीकडेच किम कार्दशियन मेट गाला लूकमुळे खूप चर्चेत होती. अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन मर्लिन मनरोला श्रद्धांजली म्हणून किमने सुंदर कपडे घातले होते. किम मेट गालामध्ये तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत राहिली. 60 वर्षांपूर्वी परिधान केलेल्या मर्लिनच्या गाऊनमध्ये फिट होण्यासाठी किमने सुमारे 7 किलो वजन कमी केले आणि ड्रेसमध्ये फिट झाली. किम कार्दशियन एक अभिनेत्री-मॉडेल तसेच एक यशस्वी उद्योजक आहे. 4 मुलांची आई असलेली किम कान्ये वेस्टपासून वेगळी झाली आहे. किम सध्या कॉमेडियन पीट डेव्हिडसनला डेट करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा