Wednesday, July 3, 2024

शाहरुख खानच्या बंगल्यातील एक खोली घ्यायचीये? घ्यावी लागेल तब्बल ३० वर्षे मेहनत, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

बॉलिवूड कलाकारांमध्ये सर्वाधिक आलिशान घर कोणत्या अभिनेत्याचे असेल, तर ते म्हणजे ‘किंग खान’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुख खान याचे. शाहरुखच्या घराबाबत त्याच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. स्वत:च्या अभिनयाच्या जोरावर आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक बनलेला शाहरुख शेकडो कोटींच्या घरात राहतो. मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी शाहरुखच्या घराबाहेर उभे राहून फोटो काढण्याची इच्छा होतेच होते. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का? की शाहरुखच्या घराच्या एका खोलीची किंमत किती असेल? नाही ना, तर याचे उत्तर खुद्द शाहरुखनेच दिले होते. चला जाणून घेऊया…

सुपरस्टार शाहरुख खान याचा ‘मन्नत’ बंगला (Shah Rukh Khan House Mannat) खूपच शानदार आणि आलिशान आहे. यामध्ये राहणे हे कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाहीये. सर्वांनाच माहिती आहे की, शाहरुखचे घर जगभरातील सर्वात शानदार घरांच्या यादीत सामील आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या घराची किंमत २०० कोटींपेक्षा जास्त आहे. अशात या बंगल्यातील एका खोलीचे भाडे किती रुपये असेल, याची माहिती स्वत: शाहरुख खान याने दिली आहे.

खर्च करावी लागेल ३० वर्षांची मेहनत
खरं तर, शाहरुखने आपल्या चाहत्यांसाठी #AskSRK सेशनचे आयोजन केले होते. यावेळी त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी निगडीत गोष्टींबाबत प्रश्न विचारले होते. यादरम्यान एका चाहत्याने त्याच्या ‘मन्नत’ बंगल्यातील खोलीच्या भाड्याबद्दल विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना शाहरुखने ट्वीट करत लिहिले की, “३० वर्षांच्या मेहनतीत मिळेल.” त्याने जरी खोलीच्या किंमतीबद्दल सांगितले नसले, तरीही त्याने या प्रश्नाचे उत्तर त्याच्या एका ओळीत दिले आहे.

भाडेतत्वावर खरेदी केले होते मन्नत
शाहरुखचा ‘मन्नत’ (Mannat) हा बंगला त्याच्या चाहत्यांसाठी कोणत्याही पर्यटन स्थळापेक्षा कमी नाही. त्याचे हे घर पाहण्यासाठी चाहते देशातूनच नाही, तर परदेशातूनही येतात. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याने हा बंगला सन २००१मध्ये जवळपास १३.३२ कोटी रुपयांमध्ये भाडेतत्वावर खरेदी केला होता.

पठाणमध्ये दिसणार शाहरुख खान
मोठ्या काळानंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो ‘पठाण’ (Pathan) या आगामी सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा २५ जानेवारी, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत, तर या सिनेमाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.

हे देखील वाचा