Saturday, July 6, 2024

जेव्हा शाहरुखने केली गणपतीची स्थापना; मुलगा अबरामच्या पूजा करण्यावर कट्टरपंथींनी साधला होता निशाना

आपला भारत देश धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक येथे आनंदाने आणि गुण्यागोविंदाने राहतात. अशात सर्वजण एकमेकांचे सणउत्सव एकत्र साजरे करतात. यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख अशा अनेक जातींचे लोक एकत्र सणांचा आनंद घेतात. यासर्वांमध्ये सिनेसृष्टीतील काही अभिनेते देखील सर्व धर्माचे सण साजरे करतात. त्यांना चाहतावर्ग वाढवायचा असतो म्हणून ते सर्व सण साजरे करतात, असे म्हणणारे काही टीकाकार असतात. परंतु मनामध्ये कुठलीही आशा, अपेक्षा न ठेवता अनेक कलाकार धर्मनिरपेक्ष असतात. यातीलच एक शाहरुख खान.

बॉलिवूडमध्ये गेली अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा किंग खान आपल्या घरी दरवर्षी गणेश मूर्तीची स्थापना करतो. तो मुस्लिम आहे, तरी देखील गणपतीची स्थापना करतो म्हणून अनेक मुस्लिम कट्टर धर्मीय त्याच्यावर टीका करतात. अभिनेत्याने सर्वात आधी गणेश मूर्तीची स्थापना केली होती, तेव्हा त्याने आपल्या मुलाबरोबर बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता, आणि लिहिले होते की, “आमचे गणपती बाप्पा घरी आले आहेत, आमचा छोटू त्यांना असेच बोलतो.” त्यानंतर त्याला कट्टरपंथींनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. (King Khan when trolled for sharing abram photo praying ganesh chaturthi)

काही कट्टर मुस्लिम लोकांना त्याचा धर्मनिरपेक्षपणा पचला नव्हता. त्यामुळे त्या फोटोवरून त्याला खूप जास्त प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी त्याला कमेंटमध्ये असे म्हटले होते की, “हे बरोबर नाही.” एकाने लिहिले होते की, “हे पाप आहे.” अशा टीकांचा सामना करून देखील त्याने आपले मत बदलले नाही. अजूनही तो दरवर्षीप्रमाणे होळी, गणपती, दसरा, ईद, रमजान असे सर्व सण साजरे करतो.

कारण त्याच्यावर टीका करणाऱ्यांप्रमाणे त्याचे कौतुक करणारे देखील खूप लोक आहेत. अनेक नागरिकांनी त्याच्या या गोष्टीचे स्वागत केले. तसेच त्याला शुभेच्छा देखील दिल्या. त्याच्याप्रमाणे सलमान खान देखील आपल्या घरी गणेश मूर्तीची पस्थाना करतो. तसेच शाहरुख असे म्हणतो की, “मी लहान असताना आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहायचो तिथे सर्व सण एकत्र साजरे केले जायचे. त्यामुळे मी देखील तसेच करतो. माझ्या मुलांवर माझे कुठलेच बंधन नाही. त्यांना हवा तो धर्म ते स्वीकारू शकतात. माझे त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर कुठलेही बंधन नाही.”

कलाकारांचे सर्व धर्माचे चाहते असतात. अनेक चाहते आपल्या आवडीच्या कलाकाराचे अनुकरण करत असतात. कलाकार जसे वागतील तसेच वागण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तरुणाईसाठी आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी असे कलाकार आदर्श आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बबिता जीं’चा पहिला पगार होता फक्त ‘एवढे’ रुपये; आज आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

हे देखील वाचा