झी मराठीवरील एक मालिका या वर्षी खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेने महाराष्ट्रातील सर्वांनाच वेड लावले होते. ती मालिका म्हणजे ‘देवमाणूस’ होय. चांगुलपणाचा पडदा घेऊन साध्याभोळ्या लोकांना फसवणारा राक्षस कशाप्रकारे लोकांचाच खून करतो, हे या मालिकेतून दाखवले आहे. या मालिकेमध्ये अनेक नवीन वळणं आली. डॉक्टर अजित कुमार देव म्हणजेच देवी सिंग हा अजूनही लोकांना कसे फसवत आहे, असे दाखवले जात होते. परंतु लवकरच या देवमाणसाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग रविवारी (१५ ऑगस्ट) टेलिकास्ट केला गेला. अशातच या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड याने एक व्हिडिओ शेअर केला आहे.
किरणने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो ‘देवमाणूस’ या मालिकेचा शेवटचा भाग शूट करत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो भावुक झालेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याच्या डोक्यातून रक्त येतं दिसत आहे. तसेच त्याने सांगितले की, ‘देवमाणूस’ या मालिकेचा शेवट असा होणार आहे.
किरण म्हणतो की, “कधीच विचार केला नव्हता की, असं काहीतरी होईल. असा सीन कधी करावा लागेल. त्रास होतोय खूप. पडदा उघडतो, रंगमंचावर वावरतो. रसिकांच्या टाळ्या, प्रेम सगळं झाल्यांनतर जसं सगळं मोकळं होत ना तसं झालाय अगदी. माझ्या पोटात खूप कालवा झालाय, माझ्याकडे आता शब्द नाहीत. काहीतरी भन्नाट घेऊन भेटूयात लवकरच. असंच माझ्यावर प्रेम करत राहा.”
किरण गायकवाड या मालिकेत मुख्य आणि खलनायकाच्या भूमिकेत होता. खलनायकाच्या भूमिकेत असूनही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली होती. संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्या या पात्राला डोक्यावर घेतले होते. तसेच ‘देवमाणूस’ ही मालिका देखील प्रेक्षकांना खूप भावली होती. तसेच मालिकेतील इतर पात्र देखील प्रेक्षकांना पसंत पडली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–रानू मंडल आठवतेय का? तिचा ‘बचपन का प्यार’ गाणे गातानाचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
-‘ये वतन वतन मेरे आबाद रहे तू’, गाण्यावर डान्स करत रिंकूने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; तुम्हीही पाहा
-स्वातंत्र्यदिनाचा उत्साह परदेशातही! अमेरिकन व्यक्तीने ‘चक दे इंडिया’ गाण्यावर केला भन्नाट डान्स