Wednesday, July 3, 2024

काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट

क्रूझवर चालू असलेल्या अंमली पदार्थांच्या पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे नाव समोर आल्यानंतर, तो चांगलाच चर्चेत आला आहे. एनसीबीने त्याला रविवारी (३ ऑक्टोबर) अटक केली आहे. न्यायालयाने आर्यनसह इतर तीन आरोपींना एका दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवले आहे. अशातच एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. याच्याशी संबंधितच या प्रकरणामध्ये एक नवं वळण आलेलं पाहायला मिळत आहे.

असे मानले जात होते की, हा फोटो आर्यन खानच्या चौकशीपूर्वी म्हणजेच, तो एनसीबी ताब्यात असताना घेण्यात आला आहे. सोशल मीडिया युजर्स त्या व्यक्तीला एनसीबीचे कर्मचारी असल्याचे समजत होते. मात्र, त्यानंतर एनसीबीने स्पष्ट केले की, आर्यन खानसोबत या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती एनसीबीचा अधिकारी किंवा कर्मचारी नाही. (kiran gosavi who clikced selfie with aryan khan now faces arrest threat as he is wanted cheating case in pune)

आता या व्यक्तीबद्दल बरीचशी माहिती समोर येत आहे, जी चकित करणारी आहे. सेल्फीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचं नाव किरण गोसावी आहे. अलीकडेच एक व्हिडिओही समोर आला होता, ज्यामध्ये गोसावी आर्यनला हाताशी धरून एनसीबी कार्यालयात नेत होता. त्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आर्यन खानला तोऱ्यात पकडून नेणारा गोसावी हा फरार आरोपी असल्याचं समोर येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी गोसावीबद्दल प्रश्न उपस्थित केल्याने आर्यन प्रकरणात आता नवा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे.

एनसीबी क्रूझवरील कारवाईत सामील असलेल्या किरण गोसावीवर २०१८ मध्ये पुण्यात ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून पुणे पोलिस त्याच्या शोधात होते. किरण गोसावी याने मलेशियात नोकरी मिळवण्याच्या बहाण्याने पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक केली होती. चिन्मयला मलेशियात पाठवण्यातही आले. पण तिथे पोहोचल्यावर त्याला समजले की, त्याला फसवले गेले आहे.

कसा तरी, चिन्मय देशमुख मलेशियातून पुण्यात परतण्यास यशस्वी झाला. पण परत आल्यावर जेव्हा त्याने गोसावीकडे पैसे मागितले, तेव्हा गोसावीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर चिन्मयने गोसावीविरोधात तक्रार दाखल केली, पण तेव्हापासून तो फरार होता. मात्र आर्यन खानसोबतची सेल्फी आणि त्याच्या हाताला धरून नेण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गोसावी पुन्हा चर्चेत आला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा