Saturday, April 19, 2025
Home मराठी आजही कायम आहे किशोरी शहाणेंचं सदाबहार सौंदर्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

आजही कायम आहे किशोरी शहाणेंचं सदाबहार सौंदर्य, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, ‘खरंच की!’

मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटातील त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांसमोर सादर केल्या. मोठा पडदा गाजवल्यानंतर किशोरी ‘बिग बॉस मराठी’ या रियॅलिटी शोमध्ये दिसल्या होत्या. यानंतर त्या आता छोट्या पडद्यावरील ‘गुम है किसी के प्यार में’ या हिंदी मालिकेतून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. याशिवाय किशोरी सोशल मीडियावर सक्रिय राहून, त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात.

नुकतेच किशोरी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांच्या मनमोहक सौंदर्याचं दर्शन चाहत्यांना घडलं आहे. यात त्यांनी साडी नेसली आहे, सोबतच दागिने घालून सर्व साजशृंगार केला आहे. तसेच व्हिडिओमध्ये त्या ‘अलबेला सजन’ या गाण्यावर त्यांच्या अदा आणि एक्स्प्रेसशन्स दाखवताना दिसत आहेत.

आतापर्यंत या व्हिडिओला हजारो युजर्सने लाईक केलं आहे. शिवाय चाहते त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट्स करून त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत. किशोरी नेहमी सोशल मीडियावर त्यांचे डान्स व्हिडिओ शेअर करत असतात, ज्याला चाहतेही भरभरून पसंती देतात. अशातच त्यांचा हा व्हिडिओ देखील चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे.

किशोरी यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी बऱ्याच हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या समवेत भूमिका असलेल्या ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तसेच ‘शिर्डी साईबाबा’ याद्वारे त्यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केलं होतं. याशिवाय किशोरी चित्रपट निर्मात्या देखील आहेत. २०१९ साली कलर्स मराठी चॅनलवरील ‘बिग बॉस’ मराठी रियॅलिटी शोमधील सहभागामुळे त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या होत्या. आजकाल त्या हिंदी मालिका ‘गुम है किसी के प्यार में’ मालिकेत झळकत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीरा जग्गनाथच्या अश्रूंचा फुटला बांध, गायत्री दातारला मिठी मारत मन केले मोकळे

-अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ २’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा 

-सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा विवाहसोहळा संपन्न, पारंपरिक पद्धतीने जोडी अडकली लग्नबंधनात

हे देखील वाचा