Thursday, March 13, 2025
Home अन्य एकदम झक्कास! अभिनेत्री किश्वर अन् पती सुयशने गळ्यावर गोंदवले मुलाचे नाव; पाहा खास व्हिडिओ

एकदम झक्कास! अभिनेत्री किश्वर अन् पती सुयशने गळ्यावर गोंदवले मुलाचे नाव; पाहा खास व्हिडिओ

टीव्हीचे प्रसिद्ध जोडपे म्हणजे अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि अभिनेता सुयश राय हे दोघं सध्या आई- बाबा झाल्याचा आनंद लुटत आहे. २७ ऑगस्ट, २०२१ रोजी किश्वरने बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलाच्या जन्मापासून, किश्वर आणि सुयश त्यांच्या नवीन प्रवासाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवत आहेत. याच संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते म्हणजे या जोडप्याने आता त्यांच्या मुलासाठी नाव गोंदवतानाचा एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे.

किश्वर- सुयशने गळ्यावर गोंदवले मुलाचे नाव
किश्वर आणि सुयश या दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये किश्वर म्हणत आहे की, तिचे मुल झोपलेले आहे आणि या वेळेचा फायदा घेऊन ती काहीतरी एक्सायटिंग करणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये पुढे किश्वर आणि सुयश दोघेही त्यांच्या मानेवर त्यांच्या मुलाचे नाव ‘निर्वैर’ असे गोंदवलेले दिसत आहेत. या दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

किश्वर- सुयश मुलासोबतचा प्रत्येक क्षण करतात शेअर
मुलाच्या जन्मापासून, किश्वर आणि सुयश सतत त्यांच्या मुलासोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर असतात. त्याचबरोबर या माध्यमातून ते आपला आनंद व्यक्त करतात. दोघेही त्यांच्या छोट्या राजकुमारासोबत त्यांचा प्रत्येक क्षण खास बनवत आहेत. किश्वरच्या मुलाला जेव्हा पहिल्यांदा घरी आणले, तेव्हा त्याचे खास पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. ज्याचा व्हिडिओ किश्वर आणि सुयशने देखील शेअर केला होता.

किश्वर आणि सुयश यांनी ६ वर्ष एकमेकांना डेट केले. त्यानंतर यांनी २०१६ मध्ये लग्न केले. दोघेही बिग बॉसमध्ये एकत्र सहभागी झाले होते. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मलायका अरोराला आवडतो ‘अशा’प्रकारचा व्यक्ती, मिलिंद सोमणपुढे केला खुलासा

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

हे देखील वाचा