Monday, July 1, 2024

प्रेमाला कोणतीही सीमा नसते! ‘या’ अभिनेत्रींनी स्वतःपेक्षा लहान वयाच्या मुलासोबत बांधली लग्नगाठ

प्रेम ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक सुंदर भावना असते. प्रेम म्हणजे स्वर्ग. प्रेमाला वयाची, धर्माची, कोणत्याही समाजाची कोणतीही मर्यादा किंवा कोणतीही सीमा नसते. म्हणतात ना प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण जगाला विसरून जातो. जसं सलीम- अनारकली, हीर-रांझा अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यांचे प्रेम आजही जिवंत आहे. जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते, तेव्हा वयातील फरक महत्वाचा वाटत नाही. ही वस्तुस्थिती मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अनेकवेळा सिद्ध केली आहे. बॉलिवूडमध्ये बऱ्याच वेळा असे पाहिले गेले आहे की, जेव्हा वयाने मोठी असलेली महिला कलाकार लहान कलाकाराच्या प्रेमात पडली आहे. याच संदर्भात या लेखातून माहिती घेणार आहोत.

‘या’ अभिनेत्री देखील तरुण अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या
परंतु हे फक्त बॉलिवूडला लागू होत नाही. टीव्ही जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या आहेत. आजकाल ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोची अभिनेत्री बबिता जी उर्फ ​​मुनमुन दत्ता आणि टप्पू उर्फ ​​राज यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेचा विषय बनला आहे. मुनमुन वयाने राजपेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे, पण त्यांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत आहेत. अशा काही टीव्ही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी प्रेम मिळवण्यासाठी समाजाची रूढीवादी परंपरा मोडली. (Kishwer Merchant To Munmun Dutta These TV Actresses Fell In Love With Younger Man)

१. देबीना बॅनर्जी- गुरमीत चौधरी
छोट्या पडद्यावरील राम आणि सीता खऱ्या जीवनात त्यांनी एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. त्याचबरोबर हे दोघे खूप प्रेम करतात. तर खूप कमी लोकांना माहित आहे की, गुरमीत देबीनापेक्षा लहान आहे. असे असूनही, जेव्हा दोघेही प्रेमात पडले, तेव्हा त्यांनी लग्न केले. लग्नानंतर हे दोघेही आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी असल्याचे दिसते.

२. टीजे सिद्धू- करणवीर बोहरा
कॅनेडियन अभिनेत्री टीजे टीव्हीच्या हँडसम हंक करणवीर बोहरापेक्षा जवळपास दोन वर्षांनी मोठी आहे. परंतु त्यांच्या प्रेमावर वयातील या अंतराचा काही परिमाण झाला नाही. दोघांच्या लग्नाला १५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे आणि त्यांना तीन मुली देखील आहेत. टीजे आणि करण अनेकदा सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात. जे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात.

३. सनाया इराणी- मोहित सहगल
सनाया आणि मोहित हे टीव्हीच्या सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक मानले जातात. ‘मिले जब हम तुम’ या शोच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या शोमध्ये सनायाने गुंजनची भूमिका आणि मोहितने सम्राटची भूमिका साकारली होती. पडद्यावर तर प्रेमात पडलेच, पण खऱ्या आयुष्यात देखील हे दोघे प्रेमात पडले. सनाया मोहितपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे, पण दोघांनी याचा विचार केला नाही. त्याचबरोबर या दोघांमध्ये बाँडिंग खूप छान आहे.

४. किश्वर मर्चेंट- सुयश राय
किश्वर आणि सुयश ‘प्यार की ये एक कहानी’ या शोच्या सेटवर भेटले. या शोमध्ये ही किश्वर सुयशपेक्षा खूप वयस्कर दाखवण्यात आली होती. त्याचबरोबर खऱ्या आयुष्यात देखील सुयशपेक्षा मोठी आहे. परंतु याच दरम्यान दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

त्यानंतर त्यांनी २०१६ मध्ये लग्न केले. किश्वर आणि सुयश अलीकडेच पालक झाले आहेत आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य देखील आनंदाने जगत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारतीने घेतली गोविंदाची मजा; म्हणाली, ‘९०च्या दशकातील अभिनेत्री कोणाशीही व्हायची सेट, पण आजकालच्या…’

-श्वास रोखून धरा! रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर; ‘या’ दिवशी होणार रिलीझ

-क्रिकेटमधील ‘दादा’ गाजवणार सिनेमाचं मैदान; झालीय सौरव गांगुलीच्या बायोपिकची घोषणा

हे देखील वाचा