Wednesday, July 3, 2024

अखेर सलमान खानच्या बहुप्रतिक्षित किसी का भाई किसी जान सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

अखेर तो दिवस उजाडला ज्याची सलमान खानचे फॅन्स आणि सर्वच लोकं आतुरतेने वाट बघत होते. किसी का भाई किसी जान सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मागील अनेक दिवसांपासून ज्या ट्रेलरची सर्वात जास्त वाट पहिली जात होती तो प्रदर्शित झाला आहे. भाईजानच्या फॅन्ससाठी हा ट्रेलर एक ट्रीट आहे.

सिनेमाच्या ट्रेलरची सुरुवात सलमान खानच्या संस्कृत श्लोकाने होते. या ट्रेलरमध्ये सलमान आणि पूजा यांची अतिशय रोमॅंटिक केमिस्ट्री दिसत आहे. पुन्हा एकदा सलमान खान त्याच्या प्रेमासाठी दमदार ऍक्शन करताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचे दोन लूक दिसत आहे. मोठे केस, सिक्स पॅक्स ऍब्स मध्ये सलमान जोरदार टशन देत आहे. या सिनेमाची कथा सलमान आणि पूजा यांच्या अवतीभोवती विणण्यात आली आहे. मुख्य म्हणजे सिनेमाला दाक्षिणात्य पार्श्वभूमी आहे.

याशिवाय ट्रेलरमध्ये अनेक दाक्षिणात्य कलाकारांची झलक देखील पाहायला मिळत आहे. दमदार गाणे, भारदस्त संवाद, कलाकारांचा अभिनय आदी अनेक गोष्टी सिनेमात जमून आल्याचे ट्रेलरमधून दिसत आहे. दरम्यान हा सिनेमा ईदच्या निमित्ताने अर्थात २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमातून सलमान पलक तिवारी आणि शहनाज गिल या दोन नवीन चेहऱ्यांना लाँच करत आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित किसी का भाई किसी की जान या सिनेमात सलमान खानसोबतच दग्गुबाती वेंकटेश, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, भूमिका चावला आदी अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

दुःखद! प्रसिद्ध रंगभूमिकार आणि अक्षरा थिएटरच्या सहसंस्थापक असलेल्या ‘या’ जेष्ठ अभिनेत्रींचे निधन

वयाच्या 15 व्या वर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण, लग्न करताना धर्मांतर करून आयशा टाकियाने केले सर्वाना आश्चर्यचकित

हे देखील वाचा