प्रसिद्ध गायक केके (KK) यांचे मंगळवारी (३१ मे) रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांची पत्नी त्यांच्या दोन मुलांसह आज (१ जून) सकाळी कोलकाता येथे पोहोचली. कुटुंबीय कोलकाता येथे पोहोचल्यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आता गायकाचा मृतदेह एसएसकेएम हॉस्पिटलमधून कोलकाता येथील रवींद्र सदनमध्ये नेण्यात येत आहे. गायकाला बंदुकीची सलामी दिली जाईल, अशी घोषणा सीएम ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी केली आहे.
गायक केके यांचे पार्थिव एअर इंडियाच्या एआय ७७३ विमानाने मुंबईला नेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमान कोलकाताहून संध्याकाळी ५.१५ वाजता उड्डाण घेईल आणि ८.१५ च्या सुमारास मुंबईत उतरेल. (kk last rites kk funeral will be in mumbai at muktidham shamsham)
मुक्तिधाम स्मशानभुमीत केले जातील अंत्यसंस्कार
मुंबई विमानतळावरून कुटुंबीय केके यांचे पार्थिव वर्सोवा परिसरातील पार्क प्लाझा कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या घरी घेऊन जातील. त्यांच्या पार्थिवावर घराजवळील वर्सोवा येथील मुक्तिधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केकेच्या शेवटच्या दर्शनासाठी बॉलिवूड स्टार्सचीही गर्दी होऊ शकते.
पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेज
कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, शवविच्छेदन अहवालानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही गायक केकेच्या मृत्यूची चौकशी सुरू केली असून, न्यू मार्केट पोलिस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयात नेण्यापूर्वी काय झाले, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हॉटेल अधिकाऱ्यांशी बोलत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत.”
सभागृहात होती अनियंत्रित गर्दी
मिळालेल्या वृत्तानुसार, नजरुल मंचच्या एका कर्मचाऱ्याने संभाषणात सांगितले की, सभागृहात क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. सभागृहाची क्षमता दोन ते अडीच हजार आहे, परंतु तेथे ५ हजार लोक उपस्थित होते. काहींनी दरवाजेही तोडले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा