Tuesday, July 9, 2024

गायक केके निधन- हलगर्जीपणा नडला, कार्यक्रमाच्या प्रत्यक्षदर्शींनी लावले आयोजकांवर गंभीर आरोप

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक केके (Krishnakumar Kunnath)  यांनी कोलकाता येथे एका लाईव्ह कॉन्सर्टनंतर अखेरचा श्वास घेतला. 31 मे च्या रात्री कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर, केके (53 वर्षे) यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंजाबी गायक सिद्धू मासुवाला यांच्या अकाली निधनानंतर केके यांचे निधन हा सगळ्यांसाठी मोठा धक्का आहे. केकेंच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना आणि बॉलिवूड इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण समोर आले असले तरी काही प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर धक्कादायक आरोप केले आहेत. 

लोकप्रिय गायक केके यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत. परंतु कोलकात्तामधील या कार्यक्रमात हजर असलेल्या प्रेक्षकांनी कार्यक्रमाच्या आयोजकांवर धक्कादायक आरोप केले आहेत. ज्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नेटकऱ्यांनी कोलकत्ताच्या नजरुल मंच ऑडिटोरिअमचे एसी ठिकठाक चालत नव्हते. गायक केकेंना सतत घाम येत होता. याबद्दल त्यांनी आयोजकांकडे तक्रारही केली होती परंतु ते ठिक केले गेले नाहीत असे गंभीर आरोप केले आहेत. या पोस्टमुळे आयोजकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

 

गायक केकेंच्या मृत्यूबद्दल त्यांचे मित्र अनु मलिक यांनीही शोक व्यक्त करताना याबद्दल आकस्मित मृत्यू किंवा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे निश्चित म्हणता येणार नाही. केके हे लोकप्रिय गायक होते. त्यांंना अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा, होणाऱ्या गर्दीचा चांगला अनुभव होता. ते अत्यंत शिस्तप्रिय होते. त्यामुळेच अशा व्यक्तीला ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो यावर विश्वासच बसत नाही असे म्हणत केकेंच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याचबरोबर याबद्दल पोस्टमार्टमचाही रिपोर्ट विचारात घेतला जावा असेही म्हणले आहे.

 

 

हे देखील वाचा