Wednesday, June 26, 2024

अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या घरी सुरु झाली लग्नाची तयारी, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्या बॉलिवूडमध्ये आणि मीडियामध्ये एकाच गोष्टी तुफान चर्चा आहे. ही रंगणारी चर्चा म्हणजे क्रिकेटर केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या सतत मीडियामधून ऐकायला येत आहेत. रोज त्यांच्या लग्नाबद्दल नवनवीन माहिती मिळत असली तरी अद्याप त्यांच्या लग्नाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला असून, तो व्हिडिओ आहे, केएल राहुलच्या घराचा.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की तो राहत असलेल्या बिल्डिंगला सजवले जात असून, हे घर मुंबईमध्ये पालीहिल इथे आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, राहुलच्या घराला लाइटिंगने चमकवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर असलेल्या विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यात कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “बांद्रा येथील पाली हिलमध्ये असणाऱ्या राहुलच्या घरी लग्नाची तयारी सुरु झाली आहे.” मात्र या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षणाची सांगितले आहे की, ही तयारी बिल्डिंगमध्ये होणाऱ्या एका वेगळ्या लग्नाची आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल आणि अथिया यांचे फॅन्स खुश झाले असून, ते त्यांचे फोटो पोस्ट करताना दिसत आहे. दरम्यान राहुल आणि अथिया यांचे लग्न हे सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर तीन दिवस हे लग्न होणार आहे. २१ जानेवारी ते २३ जाणवेरीपर्यंत त्यांच्या लग्नाचे विविध विधी होतील आणि २३ जानेवारीला लग्न होईल. या लग्नासाठी सलमान खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, धोनी, विराट कोहली आदी अनेक दिग्गज लोकं उपस्थित राहणार असून, फक्त जवळच्या लोकांनाच लग्नासाठी निमंत्रित केले जाणार आहे.

प्राप्त माहितीनुसार २०१८ पासून अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे एकमेकांना डेट करत आहेत. आधी त्यांनी त्यांचे नाते जगापासून लपवले मात्र नंतर त्यांनी ते स्वीकारले. अनेकदा ते त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?

कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा

हे देखील वाचा