Saturday, June 29, 2024

फटाके वाजवा रे! अथिया शेट्टी अन् केएल राहुल अडकले विवाहबंधनात

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार केएल राहुल विवाहबंधनात अडकले आहे. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीने सात फेऱ्या घेतल्या. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे 3000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुल (kl rahul) दुपारी 2:30 वाजता वरात घेऊन आला आणि सुमारे 4 वाजता केएल राहुल आणि अथिया लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर सुनील शेट्टी मुलगा अहान शेट्टीसोबत बाहेर आला आणि मीडियाला मिठाई वाटली.

 

View this post on Instagram

 

A post shared by CineRiser (@cineriserofficial)

माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका, मेंटॉर गौतम गंभीर आणि गोलंदाज वरुण आरोन यांनी केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र, न्यूझीलंड सीरीज असल्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारखे क्रिकेटपटू लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया शेट्टी हनीमूनला जाणार नाहीत. अशी माहिती माध्यमातील वृत्तांमध्ये समोर आली आहे. कारण, सध्या दोघांचेही शेड्यूल खूपच पॅक आहे, अशा परिस्थितीत लग्नानंतर दोघेही आपापल्या कामात व्यस्त असतील.(kl rahul and bollywood actress athiya shetty gets married check rahul athiya wedding first photo)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…त्या वास्तुला पुन्हा एकदा बिलगले’, म्हणत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केल्या शाळेच्या आठवणी

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा