Wednesday, June 26, 2024

अथिया पुन्हा होतेय ट्रोल; केएल राहुलसाेबत अभिनेत्रीला पाहून युजर्स म्हणाले, ‘नवीन लग्न…’

केएल राहुलसोबत लग्न केल्यापासून बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी चांगलीच चर्चेत आहे. 23 जानेवारी रोजी अथिया आणि केएल राहुलने त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. खंडाळा येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर दोघांचे लग्न पार पडले. अलीकडेच, अथिया आणि केएल राहुल लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले होते, परंतु यादरम्यान अभिनेत्री तिच्या लूकमुळे ट्रोलच्या निशाण्यावर आली.

काल संध्याकाळी म्हणजेच साेमवारी (दि. 30 जानेवारी)ला अथिया शेट्टी (athiya shetty) आणि केएल राहुल (kl rahul) मुंबईतील वांद्रे येथे एकमेकांचा हात धरताना दिसले. दोघेही डिनर डेटला येथे पोहोचले होते. यावेळी अथिया प्रिंटेड ब्लू शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये दिसली, तर राहुल व्हाइट शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसला. अथिया या लूकमध्ये खूपच स्टायलिश आणि कूल दिसत होती, परंतु सोशल मीडिया यूजर्सना ते आवडले नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून युजर्सनी अथियाच्या लूकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकाने कमेंट करत लिहिले, ‘थाेडी न्यूली मॅरिडसारखा लूक करून आली असती तर बरे झाले असते’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘बॉलीवूड अभिनेत्री आणि सामान्य मुलगी यांच्यात हाच फरक आहे… ती आपले सिंदूर, मंगळसूत्र कधीच विसरत नाही.अभिनेत्री लग्न करतात दुसऱ्या दिवसापासून ना सिंदूर ना मंगळसूत्र…मग लग्नात मंगळसूत्र आणि सिंदूराची काय गरज?’ त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, ‘नवीन लग्न झाले आहे असे वाटत नाही.’ असे भिन्नभिन्न कमेंट साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अथिया आणि केएल राहुलच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी अद्याप देण्यात आलेली नाही. अथियाचे वडील सुनील शेट्टी यांनी आयपीएलनंतर रिसेप्शन होणार असल्याची पुष्टी केली होती. या रिसेप्शन पार्टीत फिल्मी जगताशिवाय भारतीय क्रिकेट संघाचे अनेक खेळाडू सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.(kl rahul and bollywood actress athiya shetty trolled for her look in first public appearance with husband after marriage)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

मेहेंदी सजली! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातच्या हातावर सजली सुमितच्या नावाची मेहेंदी

हे देखील वाचा