बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी तिचा क्रिकेटर-बॉयफ्रेंड केएल राहुलसोबत आज म्हणजेच 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. होय, आज बॉलिवूड आणि क्रिकेट इंडस्ट्रीतील आणखी एक जोडपे त्यांच्या नात्याला नवीन नाव देणार आहे. अथिया आणि केएल राहुलची प्री-वेडिंग फंक्शन्सही सुरू झाले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील घरात दोघेही सात फेरे घेतील. रविवारी अभिनेत्याच्या खंडाळा फार्महाऊसवर त्यांचा संगीत सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
गिप्पी ग्रेवाल, क्रिकेटर वरुण आरोन, हृतिक भसीन, रोहन श्रेष्ठ यांसारख्या जवळच्या मित्रांनीही सेलिब्रिटी जोडप्याच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. अशातच लग्नाच्या ठिकाणाबाहेरील व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये डीजेवर दीपिका पदुकोणचे ‘बेशरम रंग’, ‘चुम्मा चुम्मा’ यासारखी गाणी ऐकू येतात. यावरून असे दिसून येते की, संगीत समारंभात या बॉलीवूड गाण्यांवर स्टार्सनी जबरदस्त डान्स केला. ‘मुझसे शादी करोगी’मध्ये केएल राहुल आणि अथियाने जबरदस्त परफॉर्मन्स दिल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाही तर अथियाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचे ‘झांझरिया’, ‘देखा जो तुझे यार’ ही गाणीही व्हिडीओमध्ये लग्नस्थळाच्या बाहेर दुरूनच ऐकू येत आहे.
View this post on Instagram
अथिया आणि केएल राहुलच्या संगीत सोहळ्याला जवळपास 70 पाहुणे उपस्थित होते. हे जाेडपे साेमवारी (दि. 23जानेवारी)ला दुपारी 4 वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नानंतरच कपल पॅपराझींना पोज देतील. लग्नात जवळपास 100 पाहुणे येणार असल्याचेही अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. विषेश म्हणजे या जाेडप्याने लग्नात फाेन न आणण्याची अटही ठेवली आहे.(kl rahul and bollywood actress athiya shetty wedding sangeet ceremony on in full swing in khandala guest grooved to besharam rang humma humma song)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच वाटते’, सुमित राघवनने केले मुंबई मेट्रोबद्दल ट्विट
‘मी अवली लवली…’ या स्कीटवरील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर शिवाली परब म्हणाली, “ते विराट कोहलीपर्यत…”