Saturday, June 29, 2024

के एल राहुलसोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवतेय सुनील शेट्टीची लाडकी; लिंकअप्सच्या चर्चेने इंटरनेटवर धरलाय जोर

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे नाते खूप जुने आहे. क्रिकेटर आणि सिनेसृष्टीतील अभिनेत्री अशा अनेक जोड्या आपण पहिल्या आहेत. अगदी मन्सूर अली खान पतोडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ते अगदी आताच्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मापर्यंत अनेक जोड्या जुळताना आपण पहिल्या. मात्र आता एक नवीन जोडीचे नाव या यादीत सामील झाले आहे आणि ते नाव आहे क्रिकेटर के. एल. राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी. हो मागच्या काही दिवसांपासून या दोघांच्या लिंकअप्सच्या बातम्या तुफान गाजत आहे. सोशल मीडियावरही त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहे. इतकेच नाही हे दोघंसुद्धा एकमेकांसोबतचे फोटो अगदी बिनधास्त सोशल मीडियावर पोस्ट करतात. या दोघांकडून अजून कोणत्याही प्रकारचे अधिकृत उत्तर या नात्यावर आले नाही. मात्र त्यांचे फोटो खूप बोलके असल्याने फोटो पाहूनच सर्वाना जे समजायचे ते समजत आहे.

सध्या के.एल. राहुल इंग्लंडमध्ये आहे. अथिया देखील त्याच्यासोबत इंग्लंडमध्येच आहे. हे दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत आहे. नुकतेच क्रिकेटर ईशान शर्माची पत्नी प्रतिमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ईशान शर्मा, त्याची पत्नी प्रतिमा तर आहेच. सोबतच के.एल.राहुल आणि अथिया शेट्टी देखील दिसत आहे. हा फोटो शेअर करताना प्रतिमाने कॅप्शन दिले,’राहों में उनसे मुलाकात हो गई.’

हा फोटो पोस्ट झाल्यानंतर काही काळातच व्हायरल झाला आहे. इंग्लंडमध्ये गेलेले सर्व क्रिकेटर त्यांच्या परिवारासोबत आहेत. इंग्लंडला गेल्यानंतर या दोघांचा हा पहिलाच फोटो समोर आला आहे. या फोटोवरून हे दोघं नक्कीच नात्यात आहे हे पक्के झाले आहे. अनुष्का शर्माने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या तिच्या फोटोना क्रेडिटमध्ये अथियाचे नाव दिले होते. सुनील शेट्टीची मुलगी असलेली अथिया मागच्या महिन्यात राहुलसोबत इंग्लंडमध्ये गेली आहे. के.एल.राहुल तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी जाताना सोबत तिला घेऊन गेला होता. (kl rahul and athiya shetty in england )

इंग्लंडला जाण्याआधी BCCI सोबत झालेल्या चर्चेदरम्यान केएल राहुलने अथियाला त्याची गर्लफ्रेंड सांगितले होते. राहुलने BCCI ला अथियायची ओळख त्याची गर्लफ्रेंड म्हणून करून दिली होती. एअरपोर्टवर देखील खेळाडूला त्याच्या ट्रॅव्हल पार्टनरबद्दल विचारल्यावर त्याने अथियाचे नाव घेतले होते.

के एल राहुल आणि अथिया शेट्टी नेहमी त्यांच्या रिलेशनशिपमुळं चर्चेत राहतात. या दोघांच्या अफेयरबद्दल अथियाच्या वडिलांनी अभिनेता सुनील शेट्टीने सांगितले की, ‘हे सर्व रिपोर्ट्स आहेत. सध्यातरी माझ्याकडे यावर बोलायला काही नाही. हे दोघं एक इंटरनॅशनल ब्रँड प्रमोट करत आहेत. त्यामुळे ते सोबत आहे. यापेक्षा जास्त माहिती पाहिजे असेल तर त्यांनाच विचारा.”

मागच्या अनेक महिन्यांपासून या दोघांच्या अफेयरच्या चर्चा खूपच रंगत आहे. दोघं एकमेकांच्या फोटोवर कमेंट्स करताना, एकमेकांसोबत फोटो पोस्ट करताना दिसतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्युटी इन ब्लॅक!’ सोनाक्षी सिन्हाच्या लेटेस्ट फोटोशूटने सोशल मीडियावर लावली आग; अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकला मिळतेय पसंती

-प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये नेहा कक्करचा मोठा निर्णय; या कारणामुळे ‘इंडियन आयडल’च्या फिनालेमध्येही नाही दिसणार गायिका

-राजकुमार राव- राधिका आपटे नेटफ्लिक्सवर झळकणार एकत्र; ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा पहिला लूक आला समोर

हे देखील वाचा