Wednesday, June 26, 2024

अथिया शेट्टीचा नमस्कार करताना दिसला अहान शेट्टी, फोटो पोस्ट करत म्हणाला…

नुकतीच सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल हे विवाहबंधनात अडकले आहेत. मागील अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या या दोघांनी अखेर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. य लग्नाला अगदी मोजकी आणि जवळची माणसं उपस्थित होती. आता अथिया आणि राहुल यांच्या लग्नानंतर त्यांच्या लग्नातील अनेक फोटो समोर येत आहेत. अथियाचा भाऊ अभिनेता अहान शेट्टी आणि तिचे यांचे नाते खूपच खास आणि प्रेमळ आहे. इतर बहीण भावासारखेच त्यांचे नाते असणार यात शंका नाही. जेव्हा बहीण लग्न करून दुसऱ्या घरी जाते तेव्हा भावाला तिची नक्कीच कमी जाणवते. अहानने देखील बहिणीच्या लग्नानंतर सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty)

अहान शेट्टीने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अथिया आणि राहुल यांचे काही फोटो पोस्ट केले असून, सोबत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे. अहानने दोन फोटो शेअर केले असून, यातल्या एका फोटोमध्ये तो अथियाला लग्नाच्या मंडपात घेऊन जाताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तो अथियाचा नमस्कार करत आहे. हे फोटो पोस्ट करताना अहानने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी तुमच्या दोघांवर (अथिया आणि राहुल) खूप प्रेम करतो. तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा. अहानने त्याच्या या फोटोमधून अथिया आणि राहुलला त्यांच्या नवीन आयुष्यासाठी आणि नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अहानच्या या पोस्टवर अथिया आणि राहुलने हार्ट शेप ईमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे.

तत्पूर्वी अथिया आणि राहुल यांनी २३ जानेवारी रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थित खंडाळा येथे सुनील शेट्टीच्या फार्म हाऊसवर लग्न केले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडन होणार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, जाणून घ्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से
अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा