Saturday, June 29, 2024

लेक अथियाच्या लग्नानंतर वडील सुनील शेट्टीचा आनंद; म्हणाला, ‘आता मी सासरा झालो….’

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार केएल राहुल विवाहबंधनात अडकले आहेत. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी खंडाळामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने सात फेऱ्या घेतल्या. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे 3000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता दर्शवली जात आहे. अशातच लग्न पार पडल्यानंतर सुनील शेट्टी स्वाता: पत्रकारांशी सवंदा साधत त्याने लग्नची माहिती देत सांगितले त्याशिवाय तो सासरा झाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नुकतंच सुनिल शेट्टी (Suneil Shetty) याची लेक आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) विवाह बंधनाता अडकली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा विवाह सोहळा खंडाळामधील सुनीलच्या शानदार बंगल्यामध्ये थाटामाटात पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये मोजक्याच पाहुण्यां निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये बॉलिवूडमधील काही सोलीब्रिटी आणि क्रिकेटर्सनी देखिल हजेरी लावली होती. मोजकेच नातेवाइक आणि पाहुने मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

सुनील शेट्टी जेव्ही माध्यामांशी संवाद साधण्यासाठी आला तेव्हा तो म्हणाला की, “लग्न झालं आहे. सप्तपदीही घेऊन झाल्या आहेत. मी आता सासरा झालो.” त्याशिवाय त्याच्यासोबत अहान शेट्टी देखिल आला होता. त्याने अहानबरोबर लग्नाची बातमी देत त्याचा आनंद सांगितला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. लग्नामध्ये सुनील हटके लूकमध्ये दिसून आला त्याने ब्राउन कलरची लुंगी घातली असून गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा घतल्या होत्या. त्यासोबतच आहानने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती, अहान पंढऱ्या शेरवानीमध्ये खूपच हॅंडसम दिसत होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ कारणामुळे आथिया आणि के एल राहुलच्या लग्नाला सुनील शेट्टीने दिला होकार,जाणून घ्या माहिती
बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 74व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

हे देखील वाचा