Saturday, June 29, 2024

‘या’ कारणामुळे आथिया आणि के एल राहुलच्या लग्नाला सुनील शेट्टीने दिला होकार,जाणून घ्या माहिती

बॉलिवूडचा ‘आण्णा’ म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी याची लाडकी लेक आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांचा सोमवार (दि, 23 जानेवारी) शुभ विवाह पार पडणार आहे. यांच्या लग्न सोहळ्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चार्चा सुरु होता, त्यामुळे चाहत्यांना देखिल यांच्या लग्नानाची उत्सुकता लागली होती. अता लवकरच हे जोडपं विवाह बंधनात अडकणार असून केएल राहुल सुनील शेट्टीचा जावई होणार आहे.

सुनिल शेट्टी (Suneil Shetty) याची लाडकी लेक आथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि केएल राहुल (KL Rahul) यांचं नातं नेमकं जुळलं कसं काय? त्याशिवाय सुनीलने केएल राहुल सोबत लग्न करण्यासाठी होकार कोणत्या कारणामुळे दिला असेल असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडलाच असेल. नुकतंच याचं कारण समोर आलं आहे. केएल राहुल आणि सुनील यांचं एकमेकांशी घनिष्ठ नातं आहे. ते दोघे एकमेकांशी सतत अनेक विषयांवर गप्पा मारत असतात.

सुनीला शेट्टीने 80-90च्या दशकात आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडधील अनेक गाजणारे चित्रपट दिले आहेत. त्याशिवाय त्यावेळी तो आघाडीचा अभिनेता म्हणून देखिल ओळखला जायचा मात्र, अभिनेत्याचं लहान पणासूनचं स्वप्न क्रिकेटर बनण्याचं होतं. त्यामुळे त्याने आपल्या खेळावर देखिल लक्ष केंद्रित केले होते. पण असे झाले नाही.

 

View this post on Instagram

 

सुनीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “मला देशासाठी खेळायचे होते. खेळाडू होण्यासाठी मी मार्शल आर्ट शिकलो. त्याबरोबर मी फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. पण मी केलेले मार्शल आर्ट्स अभिनय आणि चित्रपटांमध्ये उपयुक्त येईल, याचा कधी विचारही केला नव्हता.”

सुनील शेट्टीला पूर्वीपासूनच क्रिकेटर बनायचे होते मात्र, त्याला काही कारणामुळे क्रिकेटर बनता आले नाही मात्र, त्याने जावई क्रिकेटर निवडला आहे. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे सुनिल शेट्टीने त्याला आपला जावई स्वीकार केलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 74व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
फटाके वाजवा रे! अथिया शेट्टी अन् केएल राहुल अडकले विवाहबंधनात

हे देखील वाचा