Saturday, June 29, 2024

भारताच्या शानदार विजयानंतर, अथिया शेट्टीवर आपले प्रेम व्यक्त करताना दिसला क्रिकेटपटू केएल राहुल

T२० विश्वचषक २०२१ च्या ३७ व्या सामन्यात, भारताने स्कॉटलंडचा ८ विकेटने पराभव केला. अवघ्या ६.३ षटकांत विजय मिळवून भारताने सेमी फायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे, या विजयानंतर क्रिकेटपटू केएल राहुलने अभिनेत्री अथिया शेट्टीवर आपले प्रेम व्यक्त केले आहे.

भारताच्या या मोठ्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर, राहुलने इंस्टाग्रामवर अथियासोबतचा एक फोटो शेअर केला. शुक्रवारी (५ नोव्हेंबर) अथियाचा वाढदिवस होता, तर या निमित्ताने त्याने फोटो शेअर करून, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (kl rahul share birthday post for rumoured girlfriend bollywood actress athiya shetty after t20 world
cup 37th match)

राहुलने फोटोसोबत लिहिलेल्या मेसेजमधून, त्याचे अथियावरील प्रेम स्पष्टपणे दिसत आहे. भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर २ सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने लिहिले आहे की, “हॅपी बर्थडे माय लव्ह अथिया.” त्याच्या या पोस्टवर अनुष्का शर्मा, पंखुरी शर्मा, संजना गणेशन यांनी हार्ट इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

विशेष म्हणजे, अथियाने ५ नोव्हेंबर रोजी तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला आणि केएल राहुलने तिच्या वाढदिवशी शानदार खेळी खेळली. यादरम्यान ती स्टेडियममध्ये राहुलचा उत्साह वाढवतानाही दिसली. राहुलचे वेगवान अर्धशतक पाहून चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्याने अथिया आणि विराट कोहलीला बर्थडे गिफ्ट दिले आहे. कारण ५ नोव्हेंबरला भारतीय कर्णधार कोहलीचाही ३३वा वाढदिवस होता.

अथियाने तिच्या अभिनयातील करिअरची सुरुवात निखिल आडवाणी यांच्या ‘हिरो’ या चित्रपटातून केली होती. तिने त्यानंतर ‘मुबारक’, ‘नवाबजादे’ आणि ‘मोतीचुर चकनाचुर’ या चित्रपटात काम केले. ‘मोतीचुर चकनाचुर’ या चित्रपटात तिच्यासोबत नवाझुद्दीन सिद्दीकी हा मुख्य भूमिकेत होता. २०१५ ते २०१६ या काळात तिने चार पुरस्कार जिंकले. तिने ‘वोग ब्युटी अवॉर्ड’, ‘स्टारडस्ट अवॉर्ड’, ‘प्रोड्युसर गिल्ड फिल्म अवॉर्ड’ आणि ‘इंटरनॅशनल इंडियन फिल्म ऍकेडमी अवॉर्ड’ जिंकले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा