साउथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ( Saif Ali Khan ) यांचा नुकताच ‘आदिपुरुष‘ (Adipurush) या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. यामध्ये अनेक गोष्टींची नक्कल केली आहे. त्यामुळे या चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राउत याने असून या चित्रपटामध्ये खूप चुका केल्या आहेत, ज्या काही लोकांना समजल्याच नाहीत.
आदिपुरुष या चित्रपटाचा टीझर ( दि.2 ऑक्टोंबर) दिवशी अयोध्यामध्ये प्रदर्श्त केला होता. हा टीझर 100 सेकंदाचा असून यामध्ये जास्त काम व्हीएफएक्सवर केले आहे. यामध्ये सैफ अली खान याने रावणची भूमिका घेतली आहे, पण त्याचा पाहून असे वाटतच नाही की, तो रावण आहे. त्यामुळे अनेक लेकांनी त्याला खिलजी म्हणत ट्रोल केले आहे. फक्त हेच नाही तर यामध्ये अजूनही चुका आहेत जे काही लेकांना दिसल्याच नाही.
या चित्रपटाच्या टीझरमध्ये व्हीएफएक्स खूप खराब प्रकारे वापरे आहे की, आदिपुरुष चित्रपट एका कार्टुन पेक्षाही खराब वाटत आहे. त्यामुळे चाहते खूपच नाराज झाले आहेत. त्यांनी यावर अनेक मीम्स देखिल बनवले आहेत, काहींनी चित्रपटाची थट्टा करत जंगल गेम सोबत तुलना केली आहे. त्यासोबतच अभिनेता प्रभास याच्या भूमिकेवरही टीका केली जात आहे. यानमध्ये प्रभास श्रीरामच्या भूमिकेत दिसणार असून त्याने मिश्या ठेवल्या आहेत आणि पायामध्ये सॅंडल घातली आहे. आजपर्येत अनेक चित्रपट झाले आहेत मात्र, रामाचा असा अवतार कोणीच घेतला नाही. त्यासोबतच सीताची भूमिका अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon)करत असून तिच्या अवताराला देखिल ट्रोल केले आहे. तिने घातलेल्या कपड्यामुळे लोक भडकले आहेत. स्त्री आणि धर्माचे पालन करनारी आई सीता तिचा असा अवतार पाहून प्रेक्षकांच्या भावना दु;खवल्या जात आहेत.
रावण हा एक माहन धार्मिक मानूस होता. या चित्रपटामध्ये रामणाची भूमिका सैफ अली खान करत असून त्यांनी त्याला ड्रॅगनवर बसून येताना दाखवले आहे. याचा अर्थ रावणला यांवी राक्षसाच्या रुपात दाखवले आहे. टीझरमध्ये श्रीहनुमान यांचा अवतार देखिल आसा दाखवला आहे की, कधी कुनी हनुमानला पाहिलेच नाही. त्यामुळे मध्ये प्रदेशचे गृहमंत्री निरोत्तम मिश्रा खूपच भडकले आहेत. त्यांनी सांगितले की, चित्रपटात हनुमानचे अंगवस्त्र खूपच वेगळे दाखवले आहेत. मी आदिपुरुष चित्रपटाचा टीझर पाहिला आहे. त्यामध्ये अनेक दृष्य आहेत ज्यांना पाहून लोकांच्या भावनांना ठेच लागेल. आम्ही मानत असलेल्या धर्मावर अशा प्रकारच्या रुपाने तुम्ही दाखवत असाल तर ते आम्हाला अजिबात मान्य नाही. आता हनुमानचे वस्त्र चंबड्याचे दाखवले आहे. हे धर्मावर हल्ला केल्यासारखे आहे. तुम्ही लोकांच्या धार्मिक भावनांना दुखवल्याचे दृष्य दाखवले आहेत. हे
या टीझरमध्ये युद्ध होत असताना श्रीराम राक्षसासोबत युद्ध करताना दिसत आहे. हा सीन पाहिल्यानंतर काही युजरने लिहिले आहे की, प्रभास राक्षसासोबत युद्ध करताना दाखवला आहे. आजपर्यत कोणत्याच कथा आणि मालिकामध्ये असे पाहिले ऐकले नव्हते. हा सिन तर हॉलिवूड चित्रपटाचा नक्कल केला आहे. चित्रपट आदिपुरुष ट्वीटरवर ट्रेंड दाखवत आहे. या चित्रपटाला हॉलिवूडच्या अनेक चित्रपटाची तुलना केली आसून लहान मुलांच्या गेम टेंपल रन आणि गेम ऑफ थ्रोन सोबत तुलना करुन चित्रपटाची खिल्ली उडवली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भिकाऱ्यांना अन्न देण्यासाठी भिकारी बनून जायचा सलमान; अभिनेत्री म्हणाली, ‘मुंबईच्या रस्त्यांवर…’
‘शिव ठाकरे निर्लज्ज’, म्हणत बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली ‘ही’ अभिनेत्री