Thursday, July 31, 2025
Home मराठी खतरोंके खिलाडी गाजवणाऱ्या मराठमोळ्या गाश्मीर महाजनी विषयी या गोष्टी माहिती आहेत का; हिंदीतल्या या प्रसिद्ध मालिकांत केली आहे कामे…

खतरोंके खिलाडी गाजवणाऱ्या मराठमोळ्या गाश्मीर महाजनी विषयी या गोष्टी माहिती आहेत का; हिंदीतल्या या प्रसिद्ध मालिकांत केली आहे कामे…

खतरों के खिलाडी’ सीझन 14 चा सहभागी आणि टॉप 5 फायनलिस्टपैकी एक. गश्मीर महाजनी हा देखील एक मराठी अभिनेता आहे. मराठी व्यतिरिक्त हिंदी टीव्ही शो, चित्रपट आणि ओटीटीसाठीही त्याने काम केले आहे. गश्मीर लहानपणापासूनच सिनेमाशी जोडला गेला आहे. तो मराठी चित्रपट अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे.

गश्मीर महाजनी २०१० मध्ये ‘मुस्कुरा के देख जरा’मध्ये दिसला होता. २०१५ मध्ये तो ‘कॅरी ऑन मराठा’ या मराठी चित्रपटात दिसला होता. याशिवाय गश्मीर ‘मला काही प्रॉब्लेम नाही’ देऊळ बंद, धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव, बोनस अशा मराठी चित्रपटातही दिसला आहे.

हिंदी टीव्ही शोबद्दल बोलायचे तर गश्मीर ‘गुनाह’, ‘इमली’,, ‘झलक दिखला जा’, ‘तेरे इश्क में घायल’ या रिॲलिटी शोमध्ये दिसला आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘पानिपत’ चित्रपटातही तो दिसला आहे.

गश्मीर महाजनी हा मूळचा पुण्याचा आहे. गश्मीरचा जन्म ८ जून १९८५ रोजी झाला. त्याची आई मधु महाजनी आणि वडील रवींद्र महाजनी. गश्मीरला एक बहीण देखील आहे जी १३ वर्षांनी मोठी आहे. गश्मीरने महाराष्ट्रातून वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.गश्मीर 

आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी डान्स स्टुडिओ चालवत असे.कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी गश्मीर महाजनी यांनी वयाच्या १५ व्या वर्षी डान्स स्टुडिओ सुरू केला. अभिनेता असण्यासोबतच गश्मीर कोरिओग्राफर आणि थिएटर डायरेक्टर देखील आहे.

गश्मीर महाजनी यानी २०१४ मध्ये गौरी देशमुखसोबत लग्न केले. गौरी आणि गश्मीर यांनी २०१९ मध्ये त्यांचा मुलगा व्योमचे स्वागत केले. गौरी देशमुख देखील एक मराठी अभिनेत्री आहे. गौरी २०१६ मध्ये कुतुब तीन मिनारमध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

रणबीरच्या ४२ व्या वाढदिवशी आई नीतू आणि बहिण रिद्धिमाने दिल्या खास शुभेच्छा; स्पेशल व्हिडीओमध्ये दिसला लहानपणीचा रणबीर…

हे देखील वाचा