Wednesday, July 3, 2024

‘म मानाचा, म मराठीचा’, म्हणत ‘जून’पासून झाला ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीचा श्रीगणेशा

कोरोनाची एन्ट्री झाली आणि आपले जीवनच बदलून गेले. कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने नागरिकांवर अनेक निर्बंध लादली. यात सार्वजनिक ठिकाणं तर सर्वच बंद करण्यात आले, आणि लोकं घराच्या चार भिंतीत कैद झाले. मॉलपासून चित्रपटगृहांपर्यंत सर्वच जागांवर निर्बंध लागल्याने य कोरोनाच्या काळात मनोरंजनासाठी काय करावे असा प्रश्न सर्वांसमोर होता. याच काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला सुगीचे दिवस आले. चित्रपटगृह बंद असल्याने दिग्दर्शक, निर्मात्यांनी त्यांच्या कलाकृती ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचे ठरवले आणि मग काय वेबसीरिज, सिनेमा सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्मवर यायला सुरुवात झाली. घर बसल्या उत्तम मनोरंजन होत असल्याने दिवसागणिक या प्लॅटफॉर्मची लोंकांमधली क्रेझ अधिक वाढली. मात्र, हे सर्व झाले हिंदी, इंग्लिश भाषांचे. मराठीचे काय? हाच विचार प्लॅनेट मराठीने केला आणि आपल्या मराठी लोकांसाठी त्यांच्या आवडीचे त्यांच्या हक्काचे मराठीमधील एकमेव ओटीटी माध्यम प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

याच पहिल्या मराठी ओटीटीवरचा ‘जून’ नावाचा सिद्धार्थ मेनन आणि नेहा पेंडसे यांचा सिनेमा बुधवारी (३० जून) प्रदर्शित झाला आहे. विवाहित महिला आणि तरुण मुलगा यांच्या मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा फार वेगळा असतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ‘जून’ ने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली मोहोर उमटवली आहे. नुकताच ‘न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल’मध्ये सिद्धार्थ मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही जाहीर झाला आहे. किरण करमरकर, रेशम श्रीवर्धन आणि निलेश दिवेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुहृद गोडबोले आणि वैभव खिस्ती यांनी केले आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच प्रेक्षकांसाठी १० नव्याकोऱ्या वेब सीरिज आणि सुमारे ८५० तासांचे लहान मुलांसाठीचे कंटेंट बनविण्यासाठी सज्ज झाले आहे. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारांना घेऊन या १० वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लहान मुलांसाठीचे नाविन्यपूर्ण आणि मनोरंजनाने भरपूर असं कंटेंट देखील निर्मितीच्या तयारीत आहेत. येत्या नजीकच्या काळात नवीन मराठी वेब फिल्म्स, लघुपटांच्याही घोषणा करण्यात येतील.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने ‘अनुराधा’ या नव्याकोऱ्या वेबसीरिजची घोषणा केली आहे. सिनेसृष्टीला एकाहून एक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर संजय जाधव ‘अनुराधा’च्या निमित्ताने प्रथमच वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहेत.

‘प्लॅनेट मराठी’चे सर्वेसर्वा निर्माते अक्षय बर्दापूरकर, अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेल्या या मराठमोळ्या ओटीटी माध्यमाची मराठी मनोरंजनसृष्टीत जोरदार चर्चा आहे. ‘म मानाचा, म मराठीचा’ म्हणत दणक्यात प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांची मने जिंकायला सुरुवात केली आहे.

प्लॅनेट मराठी ओटीटीचा महत्त्वाचा भाग असलेल्या डिजिटल थिएटरची घोषणाही नुकतीच अभिनेते पुष्कर श्रोत्री आणि संगीत-संयोजक आदित्य ओक यांनी केली. सिने निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपले चित्रपट ऑनलाईन प्रदर्शित करावेत या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देतं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. सिने निर्मात्याला सिनेमा रिलीझचा आव्हानात्मक वाटणारा प्रवास यामुळे अगदी सहज आणि सोपा होणार आहे. आता घरबसल्या पे-पर-व्ह्यूवर प्रेक्षकांना चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोचा आनंद घेता येणार आहे. डिजिटल थिएटरमुळे निर्मात्यांच्या खिशावर कमी भार पडणार आहे.

महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सामील झाला आहे. सोबतच अभिनेत्री अमृता खानविलकर, गायत्री दातार, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण, दिग्दर्शक-सिनेमाटोग्राफर संजय जाधव या मोठ्या कलाकारांची प्लॅनेट मराठीमध्ये एन्ट्री झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू

‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती

तापसीवर कंगनाची आगपाखड! म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’

हे देखील वाचा