Wednesday, March 11, 2026
Home बॉलीवूड अभिनयात फ्लॉप ठरूनही आज साहिल खान आहे कोट्यवधींचा मालक, जाणून घ्या त्याच्या कमाईचा स्रोत

अभिनयात फ्लॉप ठरूनही आज साहिल खान आहे कोट्यवधींचा मालक, जाणून घ्या त्याच्या कमाईचा स्रोत

 

अभिनेता साहिल खान याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘मिस्टर इंडिया’ चा किताब जिंकणाऱ्या मनोज पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुसाईड नोटमध्ये साहिलचे नाव लिहिलेले आढळले आहे. आता या प्रकरणाचा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अहवालांनुसार, मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर त्रास दिल्याचा आरोप करत, त्याने साहिल खानविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. आपल्या सुसाईड नोटमध्ये मनोज पाटीलने लिहिले आहे की, ‘साहिलच्या छळामुळे आणि बदनामीमुळे तो हे टोकाचे पाऊल उचलत आहे.’

हे प्रकरण समोर येताच साहिल खान पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. साहिलची फिल्मी कारकीर्द काही विशेष गाजली नाही. मात्र त्याची जीवनशैली कोणत्याही राजा महाराजांपेक्षा कमी नाही. अर्थात, साहिल चित्रपटांमध्ये फ्लॉप झाला असला तरी त्याने फिटनेसच्या जगात आपला दबदबा कायम राखला आहे. याच उद्योगातून तो कोट्यवधींची कमाई करत असतो.

साहिलने बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली, पण नंतर तो अज्ञात कलाकारांच्या यादीत सामील झाला. साहिल ‘स्टाईल’ आणि ‘एक्सक्यूज मी’ या चित्रपटांमुळे तो बराच चर्चेत आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत शरमन जोशीसुद्धा मुख्य भूमिकेत होता. विशेष म्हणजे, ‘स्टाईल’ सिनेमानंतर साहिल खानने ‘रामा: द सेव्हर’, ‘डबल क्रॉस’ आणि ‘अलादीन’, असे अनेक चित्रपट केले. परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकले नाहित. त्याचबरोबर या फ्लॉप चित्रपटानंतर त्याला चित्रपट मिळणे देखील बंद झाले.

चित्रपट मिळत नसल्यामुळे साहिलने दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचे ठरवत स्वतःची जिम उघडली. त्याला या व्यवसायातून खूप फायदा झाला. तो लोकांना फिटनेससाठी प्रेरित करू लागला. हळूहळू या व्यवसायात त्याचा जम बसला त्याला अमाप यश मिळाले. आज त्याच्या जिमच्या अनेक शाखा आहेत, ज्यातून तो करोडो रुपयांची कमाई करतो. साहिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. साहिल खानने २००४ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री निगार खानशी लग्न केले, पण नंतर ते दोघेही वेगळे झाले.

साहिलने २०१४ साली टायगर श्रॉफची आई आयशा आणि साहिल खान यांच्या अफेअरच्या बातम्या समोर आल्या होत्या. आयशाने साहिलवर काही पैसे हडपल्याचा आरोपही केला होता. मात्र, आता २०१५ मध्ये नोंदवलेल्या या दोन एफआयआर मुंबई न्यायालयाने रद्द केल्या. साहिल खान आणि आयशा श्रॉफ हे दोघे ही खूप चर्चेत होते. दोघेही एकेकाळी निर्मिती कंपनीत भागीदार देखील होते. सीडीआर प्रकरणात त्यांचे नाव पुढे आल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये मोठी खळबळ उडाली होती. आयशावर बेकायदेशीररित्या साहिल खानचे कॉल डिटेल्स मिळवणे आणि ते वकील रिजवान सिद्दीकीला सुपूर्द केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

साहिल खानचे फिटनेसच्या जगात खूप मोठे नाव आहे. तो आता फिटनेस प्रभावक बनला असून, अनेकांसाठी तो प्रेरणा बनला. यातूनच तो बक्कळ पैसे कमवतो. त्याच्या सोशल मीडियावर तुम्हाला जगभ्रमंतीचे फोटो पाहायला मिळतील. जिथे तो वेगवेगळ्या मॉडेल्ससह पोज देत आहे. साहिलकडे एक खासगी विमानही आहे. त्याच्या या फोटोंवरुन लक्षात येईल की त्याचे जीवन तो किती आलिशान पद्धतीने जगतो.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कू’ ऍपवरही कंगना रणौत गाजवतेय वर्चस्व; काही दिवसांतच मिळवले तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स

-‘हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट’, म्हणत मनोज पाटील आत्महत्या प्रकरणावर साहिल खानने सोडले मौन

-शूटिंग सोडून तुर्कीमध्ये ‘हे’ काम करताना दिसली बॉलिवूडची ‘बार्बी गर्ल’, व्हिडिओ शेअर करत म्हणतेय…

हे देखील वाचा