मोनालिसा भोजपुरी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री. तिने तिच्या बोल्डनेसने आणि मादक अदांनी सर्वानाच घायाळ केले. भोजपुरी इंडस्त्रीपुरतीच मर्यादित असणाऱ्या मोनालिसाने बिग बॉसच्या १० व्या पर्वात सहभाग घेतला आणि संपूर्ण देशात काय परदेशातही तिला ओळख मिळाली. या शोनंतर तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये जबदस्त वाढ झाली. एवढेच काय तर तिला हिंदी मालिकांच्या ऑफर देखील मिळाल्या आणि मोनालिसाच्या नशिबाने एका सुखद वळण घेतले.
अंतरा बिस्वास उर्फ मोनालिसा आज प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत सामील होते. तिचा डान्स, तिचा अभिनय, तिच्या ग्लॅमरस अदा आज प्रत्येकालाच घायाळ करताना दिसतात. या इंडस्ट्रीमध्ये येऊन संघर्ष करून स्वतःचे अस्तित्व तयार करणे वाटते तितके अजिबात सोपे नव्हते. यासाठी मोनालिसाच्या खूप घाम गाळला.
मोनालिसाच्या बालपण कोलकातामध्ये गेले. १९९१ साली आर्थिक मंदी आल्यामुळे या मंदीचा फटका तिच्या घरावरपण पडला आणि तिच्या वडिलांचा उद्योग एक झटक्यात बंद झाला. या मंदीच्या काळात ती तिच्या परिवारासोबत उभी राहिली आणि घराला आर्थिक मदत करण्यासाठी कमी वयातच एक हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करण्यास सुरुवात केली. या नोकरीत तिला १२० रुपये रोजचा पगार मिळायचा.
लहानपणापासूनच तिला डान्सची खूप आवड होती. तिला या ग्लॅमर क्षेत्राचे देखील खूप आकर्षण होते, पण तिच्या घरच्यांना ही गोष्ट अजिबातच आवडत नव्हती. तिचे नातेवाईक देखील तिच्या हसायचे. ती रिसेप्शनिस्टचे काम करत असताना कोणीतरी तिला बंगाली चित्रपटांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. यानंतरच तिने मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. शेवटी तिच्या मेहनतीला यश माळले आणि १९९७ साली तिला ‘जयते’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. अंतराला तिचे काका मोनालिसा नावाने हाक मारायचे. पुढे तिने या इंडस्ट्रीमध्ये याच नावाने ओळख निर्माण केली.
करियरच्या सुरुवातीला तिने अनेक लहान मोठ्या भूमिका केल्या. शिवाय तिने बंगालीसोबतच कन्नड़, तमिल, तेलुगु, मल्याळम, उडिया आदी भाषणमधील चित्रपटांमध्ये देखील काम केले. हे करत असतंच तिने तिचा मोर्चा भोजपुरी सिनेमांकडे वळवला आणि या तिचा हा निर्णय अचूक ठरला. या चित्रपटांनी तिला भरपूर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली. ‘कहां जईबा राजा नजरिया लड़ाईके’ या सिनेमात ती पहिल्यांदा दिसली. बिग बॉसने तर तिला हिंदी इंडस्ट्रीचे दरवाजे उघडून दिले. या शोनंतर ती स्टार प्लसवरील ‘नजर’ या मालिकेत डायनच्या भूमिकेतही दिसली. शिवाय ती कलर्स चॅनेलवरील ‘नमक इस्क का’मध्ये देखील दिसली. रोजचे १२० रुपये कमवणारी मोनालिसा आज आहे कोट्यवधींची संपत्तीची मालकीण.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप