Tuesday, March 5, 2024

बिगबाॅससाठी सलमान आकारतो ‘इतकी’ फिस,17व्या सिझनचा आकडा ऐकुन तुम्हीही व्हाल हैराण

छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त चर्चा असणारा रियालिटी शो म्हणजे बिगबाॅस. या बगबाॅसचा 17 वा सिझन त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.28 जानेवारी 2024ला 17व्या सिझनचा (Big Boss 17 )ग्रँड फिनाले आहे.म्हणजेच आज रात्री या सिझनचा विजेता घोषित केला जाणार आहे. प्रत्येक सिझनप्रमाणे या सिझननेसुद्धा प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं आहे. बिगबाॅसशोमधल्या कंटेस्टंटच्या काँट्रावर्सीबद्दल जितकी चर्चा प्रेक्षकांमध्ये होती तितकीच चर्चा होते, या शोमधल्या कंटेस्टंट आणि होस्टने चार्ज केलेल्या फिसची. बिगबाॅसचा होस्ट सलमान खानची फिस दरवर्षीच्या सिझनमध्ये वाढते. सलमान खानने जेव्हा हा शो पहिल्यांदा होस्ट केला होता तेव्हा त्याने एका एपिसोडसाठी 2.5 करोड रुपये चार्ज केले होते. ही फिस प्रत्येकवर्षी वाढतंच गेली . पण तुम्हाला माहिती आहे का? यावर्षी म्हणजेच बिगबाॅस 17 ला सलमान खानने किती फिस घेतली आहे?

अंदाजे 2010मध्ये सलमान खानने बिगबाॅस होस्ट करायला सुरुवात केली. बिगबाॅसच्या चौथ्या सिझनपासुन सलमान खान या रियालिटी शोचा भाग बनला आहे आणि तेव्हापासुन आजपर्यंत सलमान खान हा शो होस्ट करत आहे. त्याने बिगबाॅसचे आतापर्यंत 13 सिझन हेस्ट केले आहेत. प्रत्येक सिझनसोबत सलमानची फिस वाढत गेली. मिडिया रिपोर्टनुसार,सलमानने बिगबाॅस 4 च्या एका एपिसोडला अडीच करोड रुपये चार्ज केले होते. सिझन 6 पर्यंत सलमान खानची फिस इतकीच होती. परंतु सातव्या सिझनमध्ये प्रत्येक एपिसोडला पाच करोड रुपये चार्ज केले. पुढे बिगबाॅसच्या प्रत्येक सिझनमध्ये सलमान खानच्या फिसमध्ये वाढ झाली. मिडिया रिपोर्टसनुसार ,सिझन 8मध्ये सलमान खानने 5.50 करोड रुपये चार्ज केले आणि त्यानंतर नवव्या सिझनमध्ये सात करोड चार्ज केले. तसेच बिगबाॅसच्या दहाव्या सिझनमध्ये सलमानने आठ करोड फिस चार्ज केली.

असं म्हणलं जातं की, बिगबाॅस अकरासाठी सलमान खानने टीवीवर चालणाऱ्या सर्व रियालिटी शोमध्ये मिळणाऱ्या फिसचे रेकाॅर्ड तोडत सलमानने अकरा करोड फिस चार्ज केली. यानंतर 12 सिझनसाठी भाईजानने 12-14 करोडची फिस चार्ज केली. सिझन 13मध्ये हा आकडा 15.50 कोटींच्या पार गेला. बिगबाॅस 14मध्ये सलमानला 20 करोड इतकी फिस मिळाली.

मिडिया रिपोर्टनुसार , बिगबाॅस 15साठी दबंग खानने(salman Khan ) 350 कोटी चार्ज केले. तर 16 व्या सिझनसाठी सलमान खानला जी फिस मिळाली इतकी आतार्यंत कोणत्याही ऍक्टरला भेटलेल्या फिसमध्ये सगळ्यात जास्त फिस आहे. असं सांगितलं जातंय की संपुर्ण 16 व्या सिझनसाठी सलमानने 1000 कोटीपेक्षाही जास्त फिस घेतली. परंतु याची कोणतीही ऑफिशिअल पुष्टी केली गेली नाही. रिपोर्टचा विचार केला तर सिझन 17 साठी सलमान खान 12 कोटी चार्ज करत आहे. परंतु अजुन याची ऑफिशिअल माहिती अजुन मिळालेली नाही.

हे देखील वाचा