Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी

मागील बऱ्याच दिवसांपासून कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या बातम्या मीडियामध्ये तुफान गाजत आहे. कॅटरिना आणि विकी डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याच्या बातम्यांनी अनेक दिवसांपासून मीडियामध्ये बज निर्माण केला आहे. या दोघांबद्दल त्यांच्या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल त्यांच्या फॅन्सला जाणून घेण्यासाठी सर्व जणं खूपच उत्सुक आहेत. कॅट आणि विकी हे दोघे राजस्थानमधील माधोपूर पॅलेस इथे लग्न करणार असल्याच्या बातम्या आहेत.

विकी आणि कॅटरिना यांच्यापैकी कोणी कोणाला प्रपोज केले, कसे केले याबद्दल आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. विकीने कॅटरिनाला अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले होते. या दोघांच्या जवळच्या एका व्यक्तीने या प्रपोजलबद्दल खुलासा करत सांगितले की, विकीने कॅटरिनाला तिची आवडती चॉकलेट ब्राऊनी देऊन लग्नासाठी मागणी घातली. विकी अतिशय रोमँटिक असून, त्याला कॅटरिनाचा गोड स्वभाव खूपच आवडतो.

Photo Courtesy: Instagram/katrinakaif & vickykaushal09

त्याने अतिशय उत्तम पद्धतीने सर्व प्लॅन केले आणि तिला प्रपोज केले. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये या दोघांमधील जवळीक वाढली. विकीने कॅटरिनाच्या आवडत्या बेकरकडून तिची आवडती चॉकलेट ब्राऊनी तयार करून घेतली आणि तिच्यासमोर या ब्राऊनीचा बॉक्स ठेवला, तिला हे खूप सामान्य वाटले मात्र जेव्हा तिने तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात लिहिले होते, “माझ्याशी लग्न करशील का?” यासोबतच त्यात एक अंगठी देखील होती. कॅटरिनाला विकीचे हे खास सरप्राईज अतिशय आवडले आणि तिने त्याला लगेचच होकार दिला.

कॅटरिना आणि विकी डेस्टिनेशन वेडिंग न करता राजस्थानमधील माधोपूर पॅलेसमध्ये राजेशाही थाटात लग्न करणार असल्याच्या बातम्या आहेत. कॅटरिना एका राजस्थानी लग्नात पोहचली असताना ती तिथली परंपरा, त्या लग्नातील भव्यता आणि कपडे, दागिने आदींनी भारावून गेली होती तेव्हाच तिने तिच्या लग्नात ती राजस्थानी स्टाईलने सर्व काही करेल असे ठरवले होते. तिला राजस्थानी संस्कृती खूपच आवडत असल्याने ती त्या प्रकारचा लेहेंगा आणि दागिने घालणारा असल्याचे म्हटले जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चित्रपटापासून दूर असूनही तब्बल ‘एवढ्या’ कोटींची मालकीण आहे बच्चन घराण्याची सून, जाणून घ्या ऐश्वर्या रायचे नेटवर्थ

-सौंदर्यवती ऐश्वर्याने कारकिर्दीत आपल्याच पायावर मारून घेतला धोंडा, केल्या ‘या’ ८ मोठ्या चुका?

-सलमानसोबत ब्रेकअपनंतर ‘अशी’ बनली ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून, रोचक आहे त्यामागची कहाणी

हे देखील वाचा