Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड आयफा २०२२ पुरस्काराच्या विजेत्यांची नावे आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

आयफा २०२२ पुरस्काराच्या विजेत्यांची नावे आली समोर, जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

मागील काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त एकाच सोहळ्याची चर्चा सुरु होती आणि तो सोहळा म्हणजे आयफा पुरस्कार. सर्वात मोठा आणि मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार सर्वच कलाकारांसाठी महत्वाचा समजला जातो. यावर्षी अबूधाबीमध्ये संपन्न होणाऱ्या या सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या सोहळ्याची तयारी मागील बरीच दिवसांपासून चालू होती. ती दिवस रंगलेल्या या पुरस्कार सोहळ्यांमध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या परफॉर्मन्सने चार चाँद लावले. यावर्षीच्या आयफा पुरस्कारांचे आकर्षण होते, सलमान खानचे खुमासदार सूत्रसंचालन. दोन वर्षांनी साजऱ्या होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यांकडे संपूर्ण बॉलिवूडसह लोकांचे लक्ष लागले होते. आता या पुरस्कारांच्या विजेत्यांच्या नावाची यादी समोर आली आहे.

पुरस्कारांवर शेरशहा सिनेमाची छाप पाहायला मिळाली. सलमान खान, शाहिद कपूर, विक्की कौशल, कृति सनोन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, अनन्या पांडे, सारा अली खान, एआर रहमान, टाइगर श्रॉफ, नोरा फतेही, यो यो हनी सिंह, पंकज त्रिपाठी आदी अनेक कलाकारांनी आपल्या उपस्थितीने या सोहळ्याला ग्लॅमर प्राप्त करून दिले. नजर टाकूया विजेत्यांच्या यादीवर.

Best Picture – शेरशाह
Best Director – विष्णु वर्धन, शेरशाह
Best Actor In A Leading Role- विक्की कौशल, सरदार उधम
Best Actress In A Leading Role – कृती सॅनॉन, मिमी
Best Actor In A Supporting Role – पंकज त्रिपाठी, लूडो
Best Actress In A Supporting Role – साईं ताह्मणकर, मिमी
Best Debut Male – अहान शेट्टी, तडप
Best Debut Female – शर्वरी वाघ, बंटी और बबली 2


Best Playback Singer Male – जुबिन नौटियाल, रतन लाम्बियान, शेरशाह
Best Playback Singer Female – असीस कौर, रतन लाम्बियान, शेरशाह
Best Music (Tie) – ए आर रहमान, अतरंगी रे, और तनिष्क बागची, जसलीन रॉयल, जावेद-मोहसिन, विक्रम मोंट्रोस, बी प्राक, जानी, शेरशाह
Best Lyrics – कौसर मुनीर, लहर दो, 83
Best Story Original – अनुराग बसु, लूडो
Best Story Adapted- कबीर खान, संजय पूरन सिंह चौहान, 83

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा