Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी

असं म्हणतात की, ‘अपयश ही यशाची पाहिली पायरी असते’ ही बाब नक्कीच १०० टक्के खरी आहे. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, विशिष्ट ठिकाणी पोहचण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो. व्यक्ती जेव्हा मोठी होते, संपूर्ण जग तिला ओळखू लागते, तेव्हा फक्त त्या व्यक्तीचे यश लोकांना दिसते, पण त्यामागे असणारी मेहनत, संघर्ष कोणालाच दिसत नाही. मनोरंजन विश्वात तर अशा असंख्य संघर्षाच्या गोष्टी आपल्याला, ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतील. कारण हे क्षेत्र असेच आहे, जिथे मेहनतीशिवाय तोड नाही. इथे पहिले काम मिळवण्यासाठी संघर्ष आहे, यश मिळवण्यासाठी संघर्ष आहे, मिळालेले यश टिकवण्यासाठी संघर्ष आहे.

आज सुपरस्टार असणाऱ्या कलाकारांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे, त्याच संघर्षाचे फळ म्हणजे त्यांना मिळालेले घवघवीत यश. आजच्या घडीला टेलिव्हिजनच्या खरा राजा असणारी व्यक्ती म्हणजे कपिल शर्मा. कॉमेडीचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिल शर्माला देखील हे यश, वैभव मिळवण्यासाठी खूपच कठीण संघर्ष करावा लागला. आज असा एक व्यक्ती नसेल ज्याला, कपिल शर्मा हे नाव माहित नसेल. त्याचे नुसते नाव जरी उच्चारले तरी चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही.

आज कपिल शर्माने या ग्लॅमर जगात जी जागा मिळवली आहे, ती त्याला मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. ‘कपिल शर्मा शो’ करून कपिल करोडपती झाला आहे. एका रिपोर्टनुसार त्याच्याकडे २८५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तो कपिल शर्माचा एक भाग होस्ट करण्यासाठी ४० ते ९० लाख रुपये घेतो. आज या लेखातून जाणून घेऊया कपिल शर्माच्या त्या कठीण संघर्षाबद्दल.

कपिलने एका मुलाखतीमध्ये त्याच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा दिला होता. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कपिलने कमी वयातच खूप मोठ्या संकटांचा सामना केला. त्याचे वडील कॅन्सरने ग्रस्त होते. जेव्हा त्यांना खूप त्रास व्हायचा तेव्हा कपिल देवाला विनंती करायचा की, त्याच्या वडिलांना यातून सोडव. त्याला त्याच्या वडिलांचा त्रास अजिबातच बघवत नव्हता. जेव्हा त्याच्या वादिकांचे निधन झाले, त्यानंतर तो संपूर्णपणे कोलमडला होता. इतकेच काय तर त्याने वडील गेल्यानंतर त्यांच्या जागेवर पोलिसांमध्ये नोकरी करण्यास देखील नकार दिला होता.

कपिलने त्याचा स्वतःचाच खर्च भागवण्यासाठी टेलिफोन बुथवर काम केले. तो दहावी असताना पॉकेट्मनीसाठी टेलीफोनबुथवर काम करायचा आणि मिळणाऱ्या पैशातून थोडे पैसे घरी द्यायचा. पैशाच्या कमतरतेमुळे त्याचं बहिणीचे लग्न देखील मोडले होते. मात्र त्याने त्याचं विनोदी शैलीलाच त्याचे हत्यार मानले आणि ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये सहभाग घेतला. जेव्हा तो हा शो जिंकला तेव्हा मिळालेल्या पैशातून त्याने त्याच्या बहिणीचे लग्न केले. हा शो जिंकल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो यशाच्या पायऱ्या चढत गेला. या शोनंतर त्याने छोटे मियां, झलक दिखला जा, कॉमेडी सर्कस अशा अनेक शोचे सूत्रसंचालन केले. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’ या शोने त्याला प्रेक्षकांच्या मनात स्थान दिले. आज कपिल सर्वात यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता सर्वच गोष्टी आहे. अनेक प्रयत्नांनी आणि मेहनतीने त्याने हे सर्व वैभव कमावले.

कपिलने १२ डिसेंबर २०१८ साली भवनीत चतरथ उर्फ गिन्नीसोबत लग्न केले. आज त्यांना अनायरा आणि त्रिशान ही दोन मुलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा