Saturday, January 17, 2026
Home मराठी निखळ सौंदर्याची परिभाषा आणि नृत्य ऑक्सिजन असणाऱ्या अभिनेत्री अर्चना जोगळेकर परदेशात कमवत आहे नाव

निखळ सौंदर्याची परिभाषा आणि नृत्य ऑक्सिजन असणाऱ्या अभिनेत्री अर्चना जोगळेकर परदेशात कमवत आहे नाव

मनोरंजनविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या सध्या जरी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसल्या तरी त्यांच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा नेहमीच होताना दिसते. अशीच एक मराठी आणि हिंदी अभिनेत्री म्हणजे अर्चना जोगळेकर. आपल्या अभिनयासोबतच, सौंदर्य आणि डान्समुळे अर्चना ओळखल्या जातात. अर्चना एक प्रशिक्षित आणि प्रोफेशनल शास्त्रीय डान्सर असून, त्यांना नृत्याचे शिक्षण त्यांच्या आईकडून आशा जोगळेकर यांच्याकडून मिळाले. आशा जोगळेकर या स्वतः एक प्रशिक्षित कथ्थक डान्सर होत्या. त्यांनी मुंबईमध्ये अर्चना नृत्यालय नावाचे डान्सिंग स्कुल देखील सुरु केले होते.

केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर अर्चना उच्चशिक्षीतही असून, त्यांनी वकिलीची डबल पदवी देखील प्राप्त केली आहे. अर्चना यांनी डान्स करत असतानाच अभिनयात पदार्पण केले. त्यांनी शांती, फुलवती आणि कर्मवीर आदी गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आणि याच भूमिकांमुळे त्यांना तुफान ओळख मिळाली. अर्चना यांनी फक्त मराठीच नाही तर उडिया आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केले.

अर्चना जोगळेकर हे नाव ९० च्या दशकात मनोरंजनविश्वात खूपच गाजले. मात्र त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला जो त्यांना आजही लख्ख लक्षात असेल. ३० नोव्हेंबर १९९७ साली अर्चना ओडिसा येथे एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या पंथा निवास येथे राहायच्या. एक दिवस रात्री तिथे भुबानानंदा पंडा हा व्यक्ती त्यांची सही घेण्याच्या बहाण्याने अर्चना यांच्या खोलीत शिरला आणि त्यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. डिसेंबर १९९७ रोजी त्या माणसाला पकडण्यात आले आणि एप्रिल २०१० साली त्याला १८ महिन्यांची कारावासाची शिक्षा भुवनेश्वर फास्ट ट्रॅक कोर्टाने सुनावली होती.

अर्चना लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या. सध्या त्या अमेरिकेत असतात. अर्चना यांनी न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले असून, तिथे त्या अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून ‘श्रृंगार मनी’ आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून ‘नृत्य भारती’ हा पुरस्कारही मिळाला आहे.

अर्चना जोगळेकर यांनी आतापर्यंत रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग यांसारख्या मराठी चित्रपटात तर संसार, मर्दानगी, बात है प्यार की, आग से खेलेंगे, स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. यासोबतच त्यांनी ‘बोगामुल’ या तामिळ चित्रपटात तर ‘सुना चंदेई’ या ओडिशा चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा